अमळनेर: पर्ल इंटरनॅशनल स्कूल,अमळनेर तर्फे 11 जानेवारी 2025 रोजी सकाळी 9 वाजता स्नेहसंमेलन व बक्षिस वितरणाचा कार्यक्रमाचे उद्घाटक प्रमुख पाहुणे डॉ. प्रा. सुरेश माहेश्वरी सर (सेवानिवृत्त प्राध्यापक प्रताप महाविद्यालय हिन्दी विभाग प्रमुख ) व कार्यक्रमाचे अध्यक्ष श्यामकांत भदाणे(माजी व्हाईस चेअरमन ग.स.सोसायटी जिल्हा जळगाव)तसेच कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून सेन्ट्रल बॅक ऑफ इंडिया अमळनेर शाखेचे मुख्य कॅशियर श्री. दिलीप राजाराम सोनवणे हे उपस्थित होते संस्थेचे चेअरमन चंद्रकांत भदाणे सर,संस्थेचे संचालक भैय्यासाहेब मगर सर,श्याम भदाणे सर, विवेक भदाणे सर,तसे संचालिका सौ. पुष्पाताई मगर यांच्या हस्ते द्विप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. स्नेहसंमेलनाची सुरूवात गणेश वंदना श्री गणेश : या गाण्यापासून करण्यात आली, ओ शेठ,भुमलो भुमलो , पुष्पा – पुष्पा, असे विविध प्रकारच्या गाण्यांवर सर्व विद्यार्थ्यांनी नृत्य सादर केले. तसेच भ्रूणहत्येवर बेटी बचाओ हे नाटक पर्ल इंटरनॅशनल स्कुल चे विद्यार्थ्यांनी सादर केले तसेच ITI च्या विद्यार्थ्यांनी अंधश्रध्देवर(आई एकविरा देवी )
हे नाटक सादर करुन सर्व विद्यार्थ्यांचे व पालकांचे मने जिंकली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु.प्रज्ञा पाटील मॅडम यांनी केले तसेच कार्यक्रम प्रास्ताविक चेअरमन श्री चंद्रकांत भदाणे सर यांनी,तर आभार कुंजल पाटील मॅडम यांनीकेले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी मयुरी चौधरी मॅडम, उष्कर्षा लोकंक्षी मॅडम तसेच ITI चे प्राचार्य प्रकाश पाटील9 सर, प्रमोद पाटील सर, समाधान शिरसाठ सर,विजय चौधरी सर, राजु पाटील, उमेश पाटील, सखाराम पावरा यांनी प्रयत्न केले.