प्रभाग आपला-जबाबदारी आमची : स्वप्ना पाटील आणि विक्रांत पाटील यांचा स्तुत्य उपक्रम…!!
अमळनेर: सालाबादाप्रमाणे ‘मोफत पतंग आमची… अन मजा तुमची’ या संकल्पनेवर आधारित महिला मराठा महासंघाच्या शहराध्यक्ष स्वप्ना विक्रांत पाटील आणि माजी नगरसेवक विक्रांत भास्करराव पाटील यांच्या मार्गदर्शनाने मकरसंक्रांती निमित्त १४ रोजी दुपारी २ वाजता भव्य पतंग महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे या महोत्सवाचे प्रमुख आकर्षण खान्देशी अहिराणी कलाकार सचिन कुमावत आणि पुष्पा ठाकूर हे असणार आहेत.
आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या उक्तीला सार्थक ठरण्यासाठी नेहमी समाजासाठी धडपळणारे स्वप्ना पाटील आणि विक्रांत पाटील हे सतत समाजपयोगी उपक्रम राबवित असतात. याचाच एक भाग म्हणून श्री संत सखाराम महाराज यांच्या शेतातील शारदा कॉलनी व सावता वाडी मधील मोकळे मैदान याठिकाणी या महोत्सवाचे आयोजन केले आहे. या पतंग महोत्सवात खा. स्मिता वाघ, आ. अनिल पाटील, माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील, माजी जि. प. सदस्या जयश्री पाटील, भा. ज. यु. मोर्चाच्या उपाध्यक्षा भैरवी वाघ पलांडे, प्रसिद्ध उद्योजिका राजश्री कल्याण पाटील यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे. हा महोत्सव सर्वांसाठी खुला असून मान्यवरांच्या हस्ते बक्षिसाचे वाटप केले जाणार आहे. या महोत्सवाला श्रीकृष्ण व देशभक्त मित्र मंडळ, वडचौक यांचे सहकार्य तर मीडिया सौजन्य ‘दै. महादर्पण’ आणि ‘महादर्पण न्यूज’ चे लाभणार आहे.
या महोत्सवात नायलॉन मांजा वापरण्यास सक्त मनाई असून जास्तीत जास्त तरुण, तरुणी, विध्यार्थी, विद्यार्थिनी आणि नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन स्वप्ना पाटील आणि विक्रांत पाटील यांनी केले आहे.