पत्रकार दिनानिमित्त “जागर लोककलेचा नवरंग महाराष्ट्राचा” अद्भुत कार्यक्रमाचे आयोजन
अमळनेर : पत्रकार दिनाच्या निमित्ताने पत्रकारितेचा सांस्कृतिक वारसा साजरा करण्यासाठी “जागर लोककलेचा नवरंग महाराष्ट्राचा” या अद्भुत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे उद्घाटन . अमळनेर नगर परिषदेचे मुख्याधिकारी केजो मॅडम व पीआय विकास देवरे साहेब तसेच पत्रकार व मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात झाले.
कार्यक्रमात महाराष्ट्राच्या विविध लोककला प्रकारांचा अनोखा संगम पाहायला मिळाला. तमाशा, लावणी, कोळीगीते, पोवाडा, गोंधळ, भारुड यांसारख्या लोककलांच्या सादरीकरणाने प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले. तसेच, महाराष्ट्राच्या संस्कृतीचा ठेवा असलेल्या या कलांमध्ये दडलेला इतिहास, परंपरा आणि सामाजिक संदेश यांचा आढावा घेतला गेला.
६ जानेवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात झालेल्या या कार्यक्रमाची सुरुवात दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर आणि मूकनायक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन पोलीस निरीक्षक विकास देवरे व मुख्याधिकारी केजो मॅडम यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाचे उद्घाटन मुख्याधिकारी केजो मॅडम व पीआय विकास देवरे साहेब तसेच पत्रकारांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले संदीप घोरपडे व पत्रकारांनी पत्रकारितेतील सत्यता, प्रामाणिकता आणि समाजिक बांधिलकीवर प्रकाश टाकला.
या कार्यक्रमात सुप्रसिद्ध गायक संदेश उमप यांनी आपल्या मधुर आवाजात विविध लोकगीते सादर करून श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.
कार्यक्रमाचे आयोजन महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ शाखा अमळनेर यांच्याकडून करण्यात आले होते. पत्रकारांच्या योगदानाला सलाम करण्यासाठी आणि महाराष्ट्राच्या समृद्ध लोककलांचे दर्शन घडवण्यासाठी हा कार्यक्रम एक आदर्श व्यासपीठ ठरला.
यावेळी पत्रकार संघाचे विभागीय उपाध्यक्ष प्रा विजय गाडे,तालुकाध्यक्ष समाधान मैराळे, सचिव सुरेश कांबळे उपाध्यक्ष नूर खान,प्रवीण बैसाणे, कोषाध्यक्ष हितेंद्र बडगुजर,आत्माराम अहिरे,रिजवान मण्यार, यदुवीर पाटील पत्रकार व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचा समारोप जय जय महाराष्ट्र माझा या गीतातून करण्यात आला, ज्याने प्रेक्षकांची मनं जिंकली. “जागर लोककलेचा नवरंग महाराष्ट्राचा” हा कार्यक्रम पत्रकार दिनाच्या निमित्ताने एका अनोख्या रूपात महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशाचा गौरव करणारा ठरला.