अमळनेर: येथील अमळनेर को-ऑपरेटिव्ह अर्बन बँकेला जळगाव जिल्हा अर्बन बँक असोसिएशन चे अध्यक्ष चंद्रहास भाई गुजराती सहकार भारतीचे प्रकोष्ट प्रमुख संजय बिर्ला, जळगाव जनता बँकेचे अध्यक्ष अनिल मदाने यांनी भेट देऊन बँकेच्या आर्थिक प्रगतीची माहिती घेवून शतक महोत्सवाकडे वाटचाल करणाऱ्या अर्बन बँकेच्या भविष्यातील वाटचालीसाठी जिल्हा अर्बन बँक असोसिएशन अमळनेर बँकेच्या पाठीशी राहील असे आश्वासन यावेळी दिले.
अमळनेर को-ऑपरेटिव्ह अर्बन बँक ही शतक महोत्सवी वर्षात पदार्पण करीत असताना बँकेची आर्थिक प्रगती व सभासदांसाठी विविध योजना राबविण्याच्या उद्देशाने बँकेचे चेअरमन पंकज मुंदडे , व्हॉईस चेअरमन रणजित शिंदे यांनी जिल्ह्यातील सहकार व बँकिंग क्षेत्रातील तज्ञ व जेष्ठ पदाधिकारी यांना अमळनेर अर्बन बँकेत मार्गदर्शनासाठी आमंत्रित केले होते. या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्हा अर्बन बँक असोसिएशन चे अध्यक्ष चंद्रहासभाई गुजराथी ,सहकार भारतीचे प्रकोष्ट प्रमुख संजय बिर्ला, जळगाव जनता बँकेचे अध्यक्ष अनिल मदाने यांनी नुकतीच भेट दिली.
याप्रसंगी झालेल्या चर्चेत बदलत्या काळानुसार बँकिंग व्हावी म्हणून संचालक मंडळ व बँकेचे कर्मचारी वृंद यांनी एकत्रित प्रयत्न करून बँकेच्या आर्थिक विकासात योगदान दिले पाहिजे. बँकेच्या आर्थिक सेवा या ग्राहक व सभासद हिताच्या असाव्यात तर बँकेचे थकीत कर्ज वसुली होण्यासाठी सर्वांनी प्राधान्याने प्रयत्न करावे. आदि विषयांवर उपस्थित जळगाव जिल्हा अर्बन बँक असोशियशन च्या मान्यवरांनी मार्गदर्शन केले.
याप्रसंगी शतक महोत्सवाकडे वाटचाल करतांना बँकेच्यावतीने सभासदांच्या आर्थिक साक्षरतेचे उपक्रम राबविण्यासह बँकेची भविष्यकालीन आर्थिक विकासात गतिमान घोडदौड व्हावी या दृष्टीने प्रयत्न व कार्यवाही सुरू असल्याचे चेअरमन पंकज मुंदडे, व्हाईस चेअरमन रणजित शिंदे यांनी सांगितले. तर व्यवस्थापक अमृत पाटील यांनी बँकेच्या विविध योजना व आर्थिक बाबी संदर्भातील माहिती झालेल्या चर्चेत मांडली. उपस्थित मान्यवरांचा स्वागत सत्कार अर्बन बँक पदाधिकारी यांनी केला. याप्रसंगी झालेल्या चर्चेत बँकेचे जेष्ठ संचालक प्रविण जैन, प्रदिप अग्रवाल, अभिषेक पाटील, लक्ष्मण महाजन यांनी उपस्थिती देत सहभाग घेतला. यावेळी चोपडा येथील माजी नगरसेवक रमेश शिंदे,अमळनेर शहरातील व्यावसायिक बाळू कोठारी, सुनिल पाटील आदिं उपस्थित होते.