━═━═━═━═━═━═━═━═━═━═━═━═🫀तुमचे हृदय निरोगी आहे का? कशी ओळखाल लक्षणे🧠━═━═━═━═━═━═━═━═━═━═━═━═

अमळनेर: अटकाव न्यूज

🎯तरूणांमध्ये का वाढतोय हार्ट अटॅक : तरूणांमध्ये वाढलेले हार्ट अटॅक, त्याची कारणे आणि परिणाम जाणून घ्या डॉ. अभिजित बोरसे यांच्याकडून

1️⃣छातीत तीव्र वेदना – अस्वस्थता : तुम्हाला सतत छातील वेदना आणि अस्वस्थता जाणवत असेल तर हे हृदयविकाराचे संकेत देतात. या वेदनांमुळे छाती जड होणे,हृदयावर दाब येणे किंवा जळजळ अशी लक्षणे दिसतात तसेच हात, मान, जबडा किंवा पाठीवर देखील परिणाम होऊ शकतो. त्यामुळे याकडे दुर्लक्ष अजिबात करू नका.

2️⃣श्वासोच्छवासासंबंधित समस्या : आणखी एक धोक्याचा संकेत म्हणजे धाप लागणे. हलक्या क्रिया करत असताना किंवा विश्रांतीच्या वेळी श्वास घेण्यास त्रास होणे, गुदमरल्यासारखे वाटणे हे देखील हृदयविकारासंबंधित लक्षण असू शकते. तुम्हाला नुसतं चालल्यानंतरही धाप लागत असेल तर वेळीच डॉक्टरांकडे जायला हवे.

3️⃣थकवा येणे : तुमच्या दैनंदिन कामात अडथळा आणणारा थकवा हा देखील हृदय विकाराचे लक्षण असू शकते. जर तुमचे हृदय कार्यक्षमतेने रक्त पंप करू शकत नसेल, तर त्याचा परिणाम शारीरीक उर्जेची पातळी कमी होऊ शकते.

4️⃣हृदयाचे अनियमित ठोके : छातीत धडधडणे किंवा अनियमित ऱ्हदयाचे ठोके याकडे बारकाईने लक्ष द्या. अनियमित हृदयाचा ठोका, ज्याला एरिथमिया म्हणून ओळखले जाते, हे अधिक गंभीर हृदयविकाराचे संकेत असू शकते. तुम्हाला जर याबाबत कळत नसेल तर तज्ज्ञांची मदत घ्यावी.

5️⃣सूज येणे : पाय, घोट्याला किंवा ओटीपोटात सूज येणे हे देखील हार्ट फेल्युअरचा संकेत देते. जेव्हा हृदयाला रक्त पंप करण्यास अपयश येते तेव्हा शरीरात द्रव जमा होतो ज्यामुळे सूज येते. तसंच डोके दुखी, चक्कर येणे किंवा मूर्च्छा येणे हे मेंदूला अपुरा रक्तपुरवठा होण्याचे कारण असू शकते आणि त्या थेट हृदयविकाराशी संबंध येतो. या घटनांचा तपास करणे महत्त्वाचे आहे.

6️⃣जास्त घाम, मळमळ अथवा उलट्या होणे : जास्त घाम येणे हा हृदयासंबंधित आजार विशेषत: हृदयविकाराचा झटका, छातीत अस्वस्थता जाणवणे किंवा श्वास घेण्यात अडचणी येणे यासारख्या इतर लक्षणांसह सूचित करू शकते. हृदयविकाराचा झटका किंवा इतर हृदयाशी संबंधित समस्यांमुळे मळमळ किंवा उलट्या होणे सामान्य आहे, विशेषतः स्त्रियांमध्ये अशी लक्षणे दिसतात. दुर्दैवाने हे पचनासंबंधित समस्या समजून याकडे दुर्लक्ष केले जाते.

7️⃣शरीराच्या वरच्या भागात होणाऱ्या वेदना : स्त्रियांना, विशेषतः, जर त्यांना हृदयाच्या समस्या होत असतील तर त्यांना पोटाच्या वरच्या भागात, हातांमध्ये, खांद्यावर, मान किंवा जबड्यात वेदना किंवा अस्वस्थता जाणवू शकतात. डाव्या खांद्यावर वेदना किंवा दाब जाणवणे हे हृदयासंबंधित समस्येचे लक्षण आहे.

जर तुम्हाला तुमच्या डाव्या हाताला किंवा खांद्यावर सतत वेदना होत असतील किंवा अनावश्यक दाब जाणवत असेल, विशेषत: श्वास घेण्यात अडचण यासारख्या हृदयविकाराच्या इतर लक्षणांशी संबंधित लक्षणे आढळल्यास तत्काळ वैद्यकीय मदत घेणे आवश्यक आहे.

🎯काय काळजी घ्यावी : वेळीच निदान आणि उपचार केल्यास एखाद्याचे प्राण वाचू शकतात. दिवसातून कमीत कमी 30 मिनिटे मध्यम शारीरिक हालचाली केल्याने हृदयविकाराचा धोका कमी होण्यास मदत होते. चालणे, पोहणे, सायकल चालवणे किंवा नृत्य करणे यासारख्या क्रियांची निवड केल्याने केवळ हृदय व रक्तवाहिन्यासंबंधीचे आरोग्य सुधारत नाही तर वजन नियंत्रित ठेवण्यात आणि तणावाची पातळी कमी करण्यात मदत होते.
━═━═━═━═━═━═━═━═━═━═━═━═

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

[democracy id="1"]