अमळनेर: संत सखाराम महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था अमळनेर येथे एकूण 200 विद्यार्थी प्रशिक्षण घेत असून त्यात 45 विद्यार्थिनी आहेत सन 2008 पासून ही संस्था पिंपळे रोडला कार्यरत असून गावापासून 4 कि. मी.अंतरावर आहे परंतु या ठिकाणी पाण्याचा प्रश्न गंभीर असून वेळोवेळी लेखी व तोंडी विनंती संस्थेने नगरपालिकेला केलेली असून देखील अजून पर्यंत पाण्याचा प्रश्न सुटलेला नाही असे कळते
भर उन्हाळ्यात मे मध्ये सुद्धा या संस्थेचे प्रशिक्षण सुरू असते. त्यामुळे विद्यार्थ्यांचे पाणी अभावी खूपच हाल होतात
विद्यार्थ्यांचे वसतीगृह बऱ्याच वर्षापासून बांधून पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने धुडखात अवस्थेत पडलेले आहे.
या वसतीगृहात 50 विद्यार्थी सामावून घेण्याची क्षमता असून पिण्याचे व वापराचे पाणी नसल्याकारणाने ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थ्यांना दरमहा तीन ते चार हजार रुपये मोजून भाड्याच्या घरात राहावे लागत आहे. तसेच पिण्याच्या पाण्याअभावी वसतीगृह बंद असल्याकारणाने विद्यार्थ्यांना ग्रामीण भागातून रोज बस ने प्रवास करावा लागत असल्याने त्यांना वेळेवर शाळेत पोहोचता येत नाही म्हणून विद्यार्थ्यांना शैक्षणिक नुकसानीस सामोरे जावे लागत असल्याचे कळते.
अमळनेर येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्था ही सार्वजनिक बांधकाम विभाग व पोलीस स्टेशनच्या मागील बाजूस असून तिथपर्यंत अमळनेर नगर परिषदेची पाईपलाईन गेलेली आहे तरी त्या ठिकाणाहून जर पाण्याची व्यवस्था झाली तर विद्यार्थ्यांच्या वस्तीगृहात राहण्यासाठी पिण्याच्या पाण्यासाठीवचा प्रश्न दूर होईल तसेंच वृक्ष संवर्धन देखील करता येईल तरी संबंधित यंत्रणांनी हा प्रश्न लवकरात लवकर सोडवावा अशी मागणी विद्यार्थ्यांकडून होत आहे.