महाराष्ट्रातील प्रसिद्ध गायक संदेश उमप सादर करणार लोकगीत; अमळनेरकरांनी मोठ्या संख्येने कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन
अमळनेर : दिनांक 6 जानेवारी रोजी पत्रकार दिनी अमळनेर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात “जागर लोककलेचा” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.सदर कार्यक्रमात महाराष्ट्राचे प्रसिद्ध गायक विठ्ठल उमप यांचे चिरंजीव गायक संदेश उमप व त्यांचे सहकारी लोकगीत सादर करणार आहेत.
सध्याच्या काळात महाराष्ट्रातील लोककला लुप्त होत आहे. यामुळे अनेक कलाकारांना हालाकीचे जीवन जगावं लागत आहे. म्हणून लोककलेला पुन्हा वाव मिळावा यासाठी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या अमळनेर शाखेने ‘जागर लोककलेचा” व हा कार्यक्रम आयोजित केला आहे.
तसेच शिवाजी महाराज यांच्या काळापासून सुरु असलेली बहिरूपी कला, लावण्या, पोवाडे, कव्वाली यांसारख्या कला मूळ कलाकार सादर करणार असून अमळनेरकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ अमळनेर शाखेच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.