गाडगेबाबा पुण्यतिथीनिमित्त मारवड महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवकांकडून दत्तक गाव करणखेडा येथे श्रमदान

अमळनेर:  मारवड येथील कै. न्हानाभाऊ मन्साराम तुकाराम पाटील कला महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिराचे आयोजन करणखेडा येथे दिनांक 19 ते 25 डिसेंबर दरम्यान आयोजित करण्यात आला आहे.‌ त्यादरम्यान आज शिबिराच्या दुसऱ्या दिवशी संत गाडगेबाबा पुण्यतिथी निमित्त स्वयंसेवकांनी गावातील बस स्टँड परिसर, आदिवासी वस्ती, मंदिर परिसर, स्वच्छता व बोरी नदी पात्राची साफसफाई तसेच गावातल्या स्मशानभूमी परिसराची स्वच्छता केली.
दुपारच्या सत्रातील व्याख्यानमालेत महाविद्यालयाचे इंग्रजी विभाग प्रमुख प्रा. डॉ.पवन पाटील यांनी स्वच्छ भारत या विषयावर राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवकांना मार्गदर्शन केले. तसेच प्रा.किशोर पाटील यांनी डिजिटल साक्षरता काळाची गरज या विषयावर मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ.सतीश पारधी यांनी केले.
अध्यक्षस्थानी महिला कार्यक्रम अधिकारी प्रा .डॉ. नंदा कंधारे मॅडम उपस्थित होत्या. कार्यक्रम यशस्वीतेसाठी राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

[democracy id="1"]