अखिल भारतीय ग्राहक पंचायत अमळनेर तर्फे २४ डिसेंबर ग्राहक दिनानिमित्ताने तहसीलदार व पुरवठा अधिकारी यांना निवेदन सादर

अमळनेर: दिनांक १२ डिसेंबर २४ रोजी अखिल भारतीय ग्राहक पंचायत अमळनेर तर्फे २४ डिसेंबर ग्राहक दिनानिमित्ताने मान. तहसीलदार श्री सुराणा साहेब यांच्यावतीने श्री ए पी कुलकर्णी साहेब यांनी निवेदन स्वीकारले व पुरवठा अधिकारी सौ. रुखसाना शेख यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की दरवर्षी ठराविक शासकीय अधिकाऱ्यांना ग्राहक संघटनांना आमंत्रित केले जात असते. परंतु यावर्षी आमंत्रितांमध्ये ग्राहकांची जास्त अडवणूक‌‌ होत असते असे क्षेत्र उदाहरणार्थ मोबाईल कंपन्यांचे प्रतिनिधी, ब्रॉडबँड , डीटीएच सेवा देणारे स्मार्टफोन्स, चॅनलचे व ऑनलाइन सेवा देणाऱ्या कंपनी चे प्रतिनिधी, बँका, फायनान्स कंपनीचे तसेच इन्शुरन्स कंपनीचे प्रतिनिधी, व्यापारी व उद्योजकांचे मेडिकल व केमिस्ट असोसिएशनचे प्रतिनिधि आणि बांधकाम व्यवसाय असोसिएशनचे प्रतिनिधी आदींना सदर कार्यक्रमास आमंत्रित करावे असे निवेदनात म्हटले आहे तसेच वरील सर्व उद्योग क्षेत्रात जर ग्राहकांना संपर्क करावयाच्या असेल तर फक्त ऑनलाईन पद्धत किंवा कस्टमर केअर नंबर एवढीच सुविधा उपलब्ध आहे व्यक्तीचे नाव त्यांचे फोन नंबर व अधिकृत पोस्टल ऍड्रेस सहजासहजी उपलब्ध होत नाही. ग्राहक संरक्षण कायदा अत्यंत सक्षम व प्रभावी असून परंतु ग्राहकास न्याय मिळण्यास अतिशय विलंब होत असतो. यासाठी या सर्व उद्योगातील व्यवसायिकांना आमंत्रित करून त्यांच्या समस्यांचे निराकरण व त्यांचे आर्थिक शोषण थांबवण्यास मदत होऊ शकते व त्या अनुषंगाने या कार्यक्रमास ग्राहकांचे हक्क व त्यांची जबाबदारी याची त्यांना जाणीव करता येईल शकते असे आम्हास वाटते. शासनाने या निवेदनाचा सकारात्मक विचार करावा असे या निवेदनात शेवटी म्हटले आहे.
याप्रसंगी अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे अध्यक्ष अध्यक्षा सौ स्मिता चंद्रात्रे, महिला प्रांत प्रमुख एडवोकेट भारती अग्रवाल, जिल्हा पालक मकसूद बोहरी, तालुका संघटक सौ ज्योती भावसार,जिल्हा बँकिंग प्रमुख विजय शुक्ला व जिल्हा ऊर्जा समिती प्रमुख सुनील वाघ, जिल्हा उपसचिव सतीश देशमुख सर आदि कार्यकर्ते उपस्थित होते.
तसेच याप्रसंगी उप भूमी अभिलेख(सिटी सर्वे) कार्यालय येथे सुद्धा अखिल भारतीय ग्राहक पंचायत अमळनेर तर्फे सदिच्छा भेट देण्यात आली. या प्रसंगी भूमी अभिलेख अधिकारी सौ स्मिता गावित यांनी सांगितले की शासनातर्फे जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील सर्व खेड्यांचे ड्रोनमार्फत सर्वे करण्यात येत असून १३५ गावे आज पर्यंत पूर्ण झालेले असून फक्त सहा खेडे गाव बाकी आहेत तरी त्यांचे सुद्धा सर्वे लवकरच पूर्ण होईल व सर्व खेड्यातील नागरिकांना सुद्धा पी आर कार्ड म्हणजेच प्रॉपर्टी चे उतारे मिळू शकेल अशी व्यवस्था शासनातर्फे होत आहे . या बाबतीत अमळनेर तालुका अग्रेसर आहे असे त्यांनी माहिती दिली. नागरिकांच्या व ग्राहकांच्या समस्या आपण दोन-तीन दिवसात पूर्ण करण्याच्या प्रयत्न करत असतो असे त्यांनी पुढे सांगितले. अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे सदस्यांनी सदर कार्यालयाला सदिच्छा भेट दिल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला व आभार सुद्धा मानले. अशी माहिती पी आर ओ सौ मेहराज बोहरी कळवितात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

[democracy id="1"]