आ.अनिल पाटलांना मंत्रिपद मिळावे म्हणून घातले सती मातेला साकडे

अमळनेर मतदारसंघाच्या विकासासाठी न्यू प्लॉट परिसरातील सती माता भक्तांनी मानला नवस

अमळनेर: मतदारसंघात विजयी झालेले आ.अनिल भाईदास पाटलांना पुन्हा मंत्रिपद मिळावे म्हणून
न्यू प्लॉट परिसरातील असंख्य सती माता भक्तांनी ग्रामदैवत सती मातेला साकडे घालून मानला आहे.
शुक्रवार हा सती मातेचा वार असल्याने यादिवशी सर्व भक्तांनी मंदिरावर जात देवी समोर बसून मंत्री पदासाठी उपासना केली.यात उपस्थित असलेले इतर भक्तगण देखील सहभागी झाले होते.दरम्यान आमदार अनिल पाटील हे देखील सती मातेचे भक्त असून देवीच्या दर्शनासाठी तेही मंदिरावर येत असतात,गेल्या वेळी मंत्री पद मिळाल्यावर देखील अनिल पाटील यांनी अमळनेर भूमीत पाय ठेवण्याआधी सती मातेचे दर्शन घेऊन प्रवेश केला होता.आताही नवरात्र उत्सवात त्यांच्या परिवाराने सती मातेच्या शेकडो प्रतिमा तयार करून भक्तांना त्याचे मोफत वितरण केले होते.
अनिल पाटलांच्या माध्यमातून अमळनेर मतदारसंघास प्रथमच मंत्रिपद मिळाल्याने मतदारसंघाच्या विकासाला मोठी चालना मिळाली होती.सुदैवाने आताही ते निवडून आल्याने मंत्री पदासाठी पुन्हा त्यांचे नाव चर्चेत आहे.मंत्री पद मतदारसंघाच्या विकासासाठी आणि निम्न तापी पाडळसरे धरणासाठी पूर्णत्वासाठी खूपच लाभदायी ठरणारे असल्याने या मंत्रीपदासाठी सती मातेला नवस मानण्यात आला.भक्तांच्या अपेक्षा निश्चितच पूर्ण होतील अश्या भावना यावेळी उपस्थित भक्तगणांनी व्यक्त केल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

[democracy id="1"]