वैद्यकीय क्षेत्रातील अनिल शिंदे भला माणूस- सुप्रसिद्ध अभिनेते किरण माने उपनेते शिवसेना उबाठा गट अमळनेरला महाविकास आघाडीचे डॉ अनिल शिंदे यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा संपन्न..
वैद्यकीय क्षेत्रातील अनिल शिंदे भला माणूस-
सुप्रसिद्ध अभिनेते किरण माने उपनेते शिवसेना उबाठा गट
अमळनेर प्रतिनिधी: महाविकास आघाडीचे तथा काग्रेसचे उमेदवार डॉ अनिल नथ्थू शिंदे यांचा प्रचारर्थ जाहीर सभेत सानेगुरुजी हायस्कूलच्या पटांगणात
सुप्रसिद्ध अभिनेते किरण माने (उपनेते शिवसेना उबाठा) म्हणाले कि एका बाजूला बदमाश आहेत तर एकीकडे बाणेदार आहेत.. गद्दारांना जागा दाखवण्याची हिच वेळ आहे,चित्रपटातही मुस्लिम द्वेष पेरत आहेत.
इडी,सिबीआयचचा दाख दाखवून पक्ष फोडण्याचे पाप भाजपने केले ..
सर्व खोके फिके पडतील संवीधानाचा वापर करा.१९४९ मध्ये
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितले होते की जातीजातीमध्ये भांडणे लावून जाती धर्मात भांडणे लावली जातील
भविष्यात त्याची पुनरावृत्ती होणार असे सांगितले होते तशी आज भिती निर्माण झाली आहे. आपले स्वतंत्र धोक्यात आले आहे. अध्यात्मिक भक्ती तुम्हाला मुक्ती मिळवून देणार पण राजकारणाची भक्ती तुम्हाला माहित आहे..देशात तिन खलनायक आहेत यांना मात देण्यासाठी मतदार हिरो आहेत. महागाई, धर्माच्या नावावर माथी बळकावतात,मालाला हमीभाव नाही..सत्ताधा-ना दाखवून द्या, देशात बलात्कार वाढत आहेत, भर रस्त्यावर गोळीबार होत आहेत, भ्रष्टाचार वाढला,छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळला, ओबीसी व मराठा समाजात भांडण लावून दिले..अशा महायुती सरकारला घरी बसवा..अमळनेर विधानसभा निवडणुकीत
डॉ अनिल शिंदे उच्च शिक्षीत भला माणूस आहे. ते नागरीकांचे जीव वाचवतात तर काही खंजीर खुपसत आहे.हे लक्षात ठेवा अमळनेरकर परीवर्तन करून डॉ शिंदे यांना संधी देतील असे त्यांनी सांगितले.
व्यासपीठावर डॉ बी.एस.पाटील, तिलोत्तमा पाटील,अमृता दास गुप्ता, प्रदेशाध्यक्ष जुगलजी प्रजापती,अँड ललिता पाटील,उमेश पाटील, प्रा.अशोक पवार, माधवराव पाटील, रिता बाविस्कर, श्याम पाटील, मनोज पाटील, सचीन पाटील, संदीप घोरपडे,प्रा.सुभाष पाटील,संगिता पाटील,भागवत सुर्यवंशी, धनगर दला,संजय पाटील,डीवायएसपी गोवीदराव पवार,भावसार,पराग आष्टे सह महाविकास आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते.
रज्जाग शेख,संदीप घोरपडे
प्रतिस्पर्धी उमेदवार अनिल पाटील, शिरीषदादा चौधरी यांच्या वर टिका करत त्यांच्यावर सळेतोड बोलत त्यांच्या कारनामाचा पाढा वाचला.तर
संजय पुना पाटील,तेली महम्मद, जेष्ठ नेते धनगर दला पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. प्रा अशोक पवार म्हणाले की
महाराष्ट्रात भाजपाने शिंदेना फोडले,चाळीस आमदार फोडले,अजीत पवार गट फोडला,ईडीचा दाखवला,सत्तेसाठी काका सोडला,विचार सोडला जातीवादी कडे गेले..डॉ शिंदे हे काग्रेस,उबाठा गटाचे,शरदचंद्र पवार गटाचे आहेत.विरोधी पक्षावर व अमळनेर येथील अपक्ष उमेदवार, मंत्री अनिल पाटील यांच्यावर टिका करत प्रा.अशोक पवार यांनी तोफ टाकली.
निळकंठ पाटील यांनी परीवर्तन होणार,मंत्री पाटील यांच्यावर टिका केली,
गोवींदराव पाटील डिवाएसपी-
हि निवडणूक ऐतिहासिक आहे, लोकशाही ची व्याख्या बदलली आता,विश्वाससाहर्ता कमी झाली,खोटारडे सरकार, लाडकी बहीण योजना फसवी,
अगोदर कधीही ईडीचा शब्द ऐकला नाही,
शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाही,
हे सरकार घटनाबाह्य आहे,किसान काग्रेसचे कार्याध्यक्ष प्रा.सुभाष पाटील म्हणाले कि अमळनेर तालुक्यातील अन्याय मतदानाच्या माध्यमातून आपणास दाखवायचा आहे. अनेक प्रकल्प गुजरात मध्ये गेले,अनेक शाळा बंद झाल्या, महायुती सरकारने भविष्य अंधारात केले.शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव नाही,हि लढाई अस्तित्वाची आहे.. म्हणून डॉ अनिल शिंदे यांच्या पाठीमागे उभे राहा असे सांगितले तर अँड ललिता पाटील-महाविकास आघाडी मध्ये लोकशाही जिवंत आहे,२००९ नंतर पंजा निशाणी आली,पंधरा वर्षे झाली, कमळ गायब झाले, पुढे घडयाळ गायब होणार आहे.महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार आणले तर देशात सरकार बदलू शकते..आता दोन्ही जणांना संधी दिली आता नको,भूमीपूत्र म्हणून डोक्यावर धरले,अहंकार ,गर्वाचे घर खाली करायचे आहे. महाराष्ट्रात बंडखोरा चे पिक आले आहे पण जनता हुशार आहे.यांना जनता घरी पाठवणार ..अनेक प्रकल्प गुजरातमध्ये गेले..सर्व लुटत आहेत.. महीला सुरक्षित नाही, या निवडणुकीत सोलून काढा,महायुतीचे सरकार कोसळणार आहे. जनसेवा हि ईश्वर सेवा मानणारा डॉ शिंदे आहे असे सांगितले.
जुगल प्रजापती प्रदेशाध्यक्ष यांनी सांगितले कि डॉ अनिल शिंदे यांना विजयी करा असे सांगितले तर माजी आमदार डॉ बी.एस.पाटील म्हणाले कि पहील्यांदा तालुक्याची निवडणूक विचित्र आहे, भाजपमध्ये अगोदर रामराज्य होते आता मोदी, अमितशहा,फडणवीस यांनी महाभारत सुरू केले आहे. पक्ष फोडला,हयामागे भाजप होते. अजीत पवार वर सातशे कोटी रूपायांचा भ्रष्टाचार करणारे उपमुख्यमंत्री झाले.महाराष्ट्र स्वाभीमानी राज्य आहे..म्हणून अमळनेर मध्ये महाविकास आघाडी सत्तेवर आणायचे आहे.तालुक्यात मंत्री झाले पण असे वाटत होते ते आमदार बरे होते पण ती आपत्ती झाली. अहंकार वाढला,फक्त
तालुक्यात चाटमा-या आहे असे सांगितले तर.तालुक्यात एकही
आमसभा झाली नाही.जाहीराती जास्त करणारा ,सर्व पदे घरात,पाडळसरे धरण,
रस्ते करायची त्यात पैसा मिळतो,हा भूमीपूजन पूत्र आहे..शिरीषदादा चौधरी यांच्या वर टिका केली.
अमळनेर विधान सभा निवडणूक महाविकास आघाडीचे उमेदवार
डॉ अनिल शिंदे म्हणाले की सर्व समाजाने प्रेम दिले. इंदिरा गांधी यांना तिरूपती बालाजी वर साक्षात्कार झाला. म्हणून काग्रेस ला पंजा मिळाला, खोटे बोलायचे नाही, उदयोग,पाणी,धरण पंधरा वर्षे होणार नाही केद्र सरकार व राज्य सरकार याला पर्याय आहे ते पावरफुल हवे.शैक्षणिक गुणवत्ता घसरली,शेत रस्ते नाही, मालाला भाव,सातत्य हवे कामात.. बारामती,शिरपूर चा विकास झाला पण अमळनेरचा का झाला नाही.
.. हे कसले भूमीपूत्र ,भूमीपूत्राला
शेतात काम करावे लागते सांगत त्यांनी कोणती कामे केली आहेत सांगावे..
महायुतीचे व अपक्ष उमेदवार शिरीषदादा चौधरी यांच्यावरही टिका केली.
सुत्रसंचालन मुन्ना शर्मा यांनी केले . सभेसाठी महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते..