चौधरी बंधूचा टेंडरचाही कारनामा पैसा हडपल्यावर नंतर काढले टेंडर
अमळनेर: चौधरी बंधूनी सूतगिरणीच्या खात्यात दरोडा टाकुन ठणठण गोपाल करून ठेवत टेंडर काढले आहे. त्यांना काय ते आता दात पाडून देत सूतगिरणी उभारणार आहेत का ? मुळातच आधी पैसे हडप करून नंतर टेंडर काढून वराती मागून घोडे, तर घरमा नही दाना, म्हणे दयाले चला ना, अशी गत या खाऊगुल्ल्या चौधरी बंधुनी सूतगिरणीची करून ठेवली आहे. त्यामुळे अमळनेरकर जनता त्यांना 20 तारखेला पुन्हा नंदुरबारचा घरचा रस्ता दाखवल्या शिवाय राहणार नाही, असा टोला कृषि उत्पन्न बाजार समितीचे अशोक आधार पाटील यांनी चौधरी बंधुना लगावला आहे.
यह पब्लिक हैं, सब जाणती हैं !माजी आमदार शिरीष चौधरी आणि त्यांचे बंधू रवींद्र चौधरी यांनी निवडणूक डोळ्यासमोर ठेवून टेंडर प्रक्रिया ही बोगस पणे राबवली आहे. त्यांनी तब्बल १४ महिने टेंडर प्रक्रिया लांबवली आहे. एन निवडणुकीचा काळ साधत ही प्रक्रिया पूर्ण केल्याचा डाव त्यांनी टाकला आहे. सूतगिरणीच्या आयडीबीआयच्या खात्यात १३ एप्रिल २०२३ रोजी १८ कोटी २० लाख २५ हजार रुपयांचे शासकीय भागभांडवल प्राप्त झाल्यानत त्यांनी लगेच टेंडर प्रक्रिया राबवणे आवश्यक होते. पण त्या शासकीय भाग भांडवलवर यांना व्याज कमवायचे होते. म्हणून त्यांनी 50 दिवसासाठी एफडी करून 14 लाखांचे व्याज कमवले आणि नंतर टेंडर प्रक्रिया राबवली आहे. त्यात २१ जून २०२४ रोजी महावीर रिएलस्पेश प्रा.लि.ने २३ कोटी ५३ लाख ५२ हजार ३५७.५० रुपयांचे तर एस.एफ चौघुले यांनी २४ कोटी ६८ लाख ३७ हजार ५५२.५५ रुपयांचे तर व्हीडीके फॅकल्टी सर्व्हिसेस प्रा. लि. ने २४ कोटी, ५० लाख ४८ हजार ८७४ रुपयांचे टेंडर भरल्याचे दाखवले आहे. यात महावीर रिएलस्पेश प्रा. लि. कमी दराने टेंडर असल्याने त्यांना बांधकामेच टेंडर देण्यात आले. २१ जून २००२४ रोजी टेंडर प्राप्त झाले त्यानंतर महिन्यभराने फायन्सिएल बीड ओपनिंग २ जुलै रोजी करण्यात आले. त्यानंतर १५ ऑक्टोबर २०२४ रोजी महावीर रिेयलस्पेश यांना टेंडर देण्यात आले. बीड ओपनींग २ जुलै रोजी झाली तर ऑगस्ट, सप्टेंबर मध्ये टेंडर देणे अपेक्षित होते. परंतु ही प्रक्रिया रखडवत ऑक्टोबरपर्यंत नेली आणि आचारसंहिता लागण्याच्या दिवशीच अंतिम टेंडरला मंजुरी दिली. याचाच अर्थ ऐन निवडणुकीच्या तोंडावर चौधरी बंधुंना सुतगीरणीचे टेंडर दिले गेल्याचे दाखवून आता सुतगीरणी उभी राहून हजारोंना रोजगार मिळेल, असे भासवायचे होते. म्हणूनच त्यांनी ही प्रक्रिया राबवली. बिड ओपिनिंग नंतर दोन महिने ते का थांबले, म्हणजे ते एवढे दिवस झोपले होते का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. पण त्यांनी कुटील डाव आखत ही प्रक्रिया रखडवली आहे. त्यांना वाटतं आपणच खूप हुशार आहोत, पण अमळनेरची जनता एवढी ही दातखुळी नाही, की चौधरी बंधुची कुटणिती ओळखू शकणार नाही, यह पब्लिक हैं, सब जाणती हैं !
टेंडरही मॅनेजचा संशय बळावला
सुतगिरणीसाठी भरण्यात आलेले टेंडरही मॅनेज असल्याचा संशय बळावला आहे. हे तिन्ही पक्षकार हे त्यांचेच आहेत. विशेष म्हणजे सुतगिरणीला १८ कोटी २० लाख २५ हजाराचे शासकीय भागभांडवल मिळाले आहे. तर २३ कोटी ५३ लाख ३५७.५० रुपयांचे टेंडर दिले कसे,असाही प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.