अमळनेर: तालुक्यात विकासकामांची गंगा आणल्याने संपूर्ण अल्पसंख्यांक वर्ग मंत्री अनिल पाटील यांच्या पाठीशी असल्याचे मत शेतकी संघाचे माजी संचालक व धार येथील सामाजिक कार्यकर्ते अलीम मुजावर यांनी व्यक्त केले आहे.
मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी गेल्या पाच वर्षात मोठ्या प्रमाणावर निधी आणून विकासकामे केली आहे. अल्पसंख्याक बहुल गावात शादिखाना व विविध कामांसाठी निधी देऊन सर्व समाज घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न मंत्री अनिल पाटील यांनी केला आहे. त्यामुळे तालुक्यातील सर्व अल्पसंख्याक समाज मंत्री अनिल पाटील यांच्या पाठीशी उभा असून ते मोठ्या मताधिक्याने निवडून येणार असल्याचा विश्वास अलीम मुजावर यांनी व्यक्त केला आहे.