महिलांसाठी विविध योजना राबवणार असल्याने महाविकास आघाडीला महिलांची पसंती,
मतदारसंघातील माय माऊली देणार डॉ. शिंदेंना मतदानरुपी आशीर्वाद: रिता बाविस्कर
अमळनेर: महिलांसाठी विविध योजना राबवणार असल्याने महिला भगिनी महाविकास आघाडीलाच पसंती देत असून मतदारसंघातील माय माऊली डॉ. अनिल शिंदेंना मतदानरुपी आशीर्वाद देणार असल्याचे मत रा.कॉ. ग्रंथालय विभागाच्या पदाधिकारी रिता बाविस्कर यांनी व्यक्त केले आहे.
महाविकास आघाडीची सत्ता आल्यास राज्यातील सर्व महिलांना महालक्ष्मी योजनेंतर्गत प्रतीमाह तीन हजार रुपये देणार आहे. तसेच महिलांना मोफत बस प्रवास कायम ठेवणार असून वर्षात सहा गॅस सिलेंडर फक्त पाचशे रुपयात देणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. अत्याचार रोखण्यासाठी निर्भय महाराष्ट्र धोरण आखून शक्ती कायद्याची अंमलबजावणी करणार येईल. प्रत्येक मुलीच्या नावे रक्कम बँकेत ठेवून अठराव्या वर्षी एक लाख रुपये देणार असल्याची ही घोषणा करण्यात आली आहे.
युती सरकारने लाडक्या बहिणींना पंधराशे एका हाताने देऊन महागाई वाढवून दुसऱ्या हाताने दुप्पट रक्कम काढून घेतल्याने महिला वर्गाची मोठी नाराजी आहे. त्यामुळे आघाडीला महिला वर्गाची पसंती आहे. त्याचप्रमाणे अमळनेर मतदारसंघातील माय माऊलींचा आशीर्वाद डॉ. अनिल शिंदे यांना लाभत असून तेच विजयी होतील असे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या पदाधिकारी रिता बाविस्कर यांनी सांगितले आहे.