महायुती एकसंघ :- भाजयुमो तालुकाध्यक्ष शिवाजी राजपूत
अमळनेर : विधानसभा मतदारसंघातील युवकांनी यावेळी महायुती च्या पाठीमागे भक्कमपणे उभे राहण्याचा निर्धार केला असून महायुतीचे उमेदवार ना.अनिल भाईदास पाटील यांना विजयी करण्याचा संकल्प केला असल्याचे भाजयुमो ते तालुकाध्यक्ष शिवाजी राजपूत यांनी सांगितले.
महायुती च्या नेत्या खासदार स्मिता वाघ, माजी नगराध्यक्षा जयश्री पाटील,भाजयुमो च्या नेत्या भैरवी वाघ पलांडे तसेच महायुती चे सर्व प्रमुख पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली मतदारसंघातील युवक एकवटला आहे.मतदारसंघ विकासाच्या दिशेला घेऊन जाण्यासाठी महायुती ला साथ देण्याच आवाहन युवकांनी केले आहे.मतदारसंघातील महायुती चे घटक पक्ष असलेल्या सर्वच पक्षातील युवकांनी समन्वय साधत ना.अनिल दादा यांच्या प्रचारात जोरदार सहभाग घेतला आहे.
मतदारसंघातील विकासकामांना बळकटी देण्यासाठी व युवकांचे प्रश्न सोडविण्यासाठी पुन्हा एकदा महायुती चे उमेदवार अनिल भाईदास पाटील यांच्यामागे खंबीरपणे उभे राहण्याचे आवाहन भाजयुमो चे तालुकाध्यक्ष शिवाजी राजपूत करत आहेत.