विकासाचे मुद्दे नसल्याने विरोधकांनी गाठली खालची पातळी
अमळनेर:महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. अनिल शिंदे यांच्या प्रचार वाहनावर असलेला काँग्रेसचा झेंडा फेकून पाईप वाकवल्याचा गलिच्छ प्रकार १७ रोजी समोर आला आहे.
डॉ. शिंदे यांचे मुख्य प्रचार वाहन त्यांच्या निवासस्थानी लावले होते. त्यावर आघाडीतील विविध पक्षांचे झेंडे लावले असून अज्ञात इसमाने त्यातील काँग्रेस पक्षाचा झेंडा काढत तो बाजूला फेकत पाईप वाकावला आहे. जनतेत मांडायला विकासाचे मुद्दे नसल्याने विरोधकांनी खालची पातळी गाठली आहे. हा पक्षाला विरोध नसून संकुचित मनोवृत्तीच्या प्रवृत्तींनी काँग्रेसच्या सर्वसमावेशक विचारधारेला केलेला विरोध असून आता जनताच याचे उत्तर देईल अशी भावना डॉ. शिंदे समर्थकांनी व्यक्त केली आहे. ह्या किळसवाण्या कृत्याचा सर्व स्तरातून निषेध व्यक्त केला जात आहे.