अमळनेर: आपल्या मतदारसंघातील महाविकास आघाडी कडून कॉंग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार डॉ. अनिल नथ्थु शिंदे हे उच्चशिक्षित आणि खानदेशातील प्रख्यात सर्जन आहेत. आपल्या तालुक्यातीलच पिळोदा गावाचे रहिवासी असलेले एका सामान्य कुटुंबातील डॉ. शिंदेचे वैद्यकीय, सामाजिक, शैक्षणिक व राजकीय क्षेत्रात मोठे योगदान आहे. तालुक्यातील प्रत्येक गावात त्यांना मानणारा, त्यांच्यावर विश्वास ठेवणारा आणि प्रेम करणारा एक मोठा वर्ग आहे.
वैद्यकीय क्षेत्रात ३५ वर्ष सेवा देत असताना त्यांच्या कडून आपल्या मतदार संघात राजकारणाच्या माध्यमातून तालुक्याचा आमदार म्हणून निवडून येवून सामान्य जनतेला लागणाऱ्या मुलभूत सुविधांची पूर्तता करून जनसेवा करण्याचा मानस आहे.
आपण अन्य दोन उमेदवारांना संधी देऊन अनुभव घेतला आहेच तरी साधा सरळ आणि आपला माणूस सच्चा जनसेवक आणि खरा भूमीपुत्र डॉ. अनिल शिंदे यांना एकदा आपले बहुमोल मत देऊन सेवेची संधी द्यावी ही नम्र विनंती.
आपलाच –
राजू शेख.