काम करणारा माणूस म्हणून अनिल दादांना सपोर्ट करा-खा.स्मिताताई वाघ
व्यापारी,डॉक्टर ,वकील आणि सी ए बांधवाच्या उपस्थितीत झाली संकल्प सभा
अमळनेर: परिसरात उद्योग व रोजगार वाढीसाठी सरकारी एमआयडीसी उभारण्याचे आपले स्वप्न असून येणाऱ्या काळात 100 जागा शोधून ते पूर्ण करणार आणि शहरात एज्युकेशनल हब निर्माण करणार अशी ग्वाही महायुतीचे उमेदवार मंत्री अनिल भाईदास पाटील यांनी संकल्प सभेत दिली.तर काम करणारा माणूस म्हणून अनिल दादांना सपोर्ट करा असे आवाहन खा.स्मिताताई वाघ यांनी केले.
शहरातील व्यापारी,व्यावसायिक बांधव,डॉक्टर ,वकील आणि इंजिनिअर,सी ए,शिक्षक आणि इतर बुद्धीजीवी मंडळींच्या उपस्थितीत बन्सीलाल पॅलेस येथे संकल्प सभा पार पडली यावेळी उपस्थित मान्यवरांनी अनिल पाटील यांच्या पाठीशी राहून विकासाला साथ देण्याची ग्वाही जाहीरपणे दिली.
यावेळी मंत्री अनिल पाटील भावना व्यक्त करताना म्हणाले की काम करणाऱ्याची कदर जनता नक्की करते,या भूमीतील सर्वांशी माझे पारिवारिक संबंध आहे,30 वर्षांपासून आपले स्नेह आहे,असे असताना कुणीतरी येत आणि आपलं दिशाभूल करतो,हे कुठेतरी थांबविले पाहिजे,याउलट आपला विकास कसा होतोय ते बघितले पाहिजे, सिंचन क्षमता वाढते आहे तेही बघितले पाहिजे.आज शहरासाठी नवीन पाणीपुरवठा योजना मंजूर झाली आहे,हेच विकासाचे पर्व आपल्याला मजबूत रचायचे आहे,विचाराची प्रगल्भता सर्वांमध्ये आहे.संत सखाराम महाराज, प्रताप शेटजी,पूज्य साने गुरुजी यांची ही भूमी असून या भूमीला पुन्हा कलंक लागला नाही पाहिजे. पूर्वी लोकप्रतिनिधी मध्ये द्वेष आणि जात पात नव्हती,पक्ष होता आणि त्यातून विचारांची लढाई होती,पण दहा वर्षात विचार बाजूला सरकून इतर द्वेष सुरू झाले आहेत.याठिकाणी मिल चालू करण्यासाठी काहींनी आश्वासन दिले असताना त्या चोरल्या गेल्या उद्या धरणही चोरीला जाईल,त्यातील पाईप ही चोरले जातील,साहेबराव दादांनी चांगले काम पालिकेत केले असताना,त्यांनी आपल्या नगरसेवकांना घरी पाठविण्याचे कृत्य केले होते,मी आणि स्मिताताई आश्वासन देतो की जीवात जीव असेल तोपर्यंत सर्वांच्या पाठीशी आम्ही उभे राहू, विकासाचे पर्व आपल्या डोळ्यासमोर दिसतेय,विप्रोला देखील चालना मिळावी म्हणून शहरात चार डी पी रस्ते टाकून बंगाली फाईल परिसरातून पर्यायी रस्त्याची व्यवस्था केली आहे.मी ही क्रिकेट चा शौकीन असून मी बॅटसमन नसलो तरी चांगला बॉलर आहे,अनेकांच्या व्हिकेट मी घेतल्या आहे,कुठे कशी गुगली टाकावी हे मला समजते असे मार्मिकपणे सांगून 20 तारखेला घड्याळाला मतदान करण्याचे आवाहन त्यांनी केले.
अमळनेर जिथे आहे तिथे ठेऊन चालणार नाही
खा स्मिताताई वाघ- पुढे म्हणाल्या की आपण बुद्धिजीवी असून मतदान करताना विचार पूर्वक मतदान करा, तुम्ही होतात म्हणून मी खासदार झाले,आपण व्हिजन असणारा माणूस निवडून दिला पाहिजे, जो दूरदृष्टी ठेऊन काम करेल त्याला निवडून द्या,अमळनेर जिथे आहे तिथे ठेऊन चालणार नाही,आपल्या समोर आव्हाने भरपूर आहेत आणि फक्त पाच दिवस शिल्लक आहे,मोठी जवाबदारी आपल्यावर आहे,अनिल दादा काम करणारा माणूस आहे,जो काम करतो त्याला त्याला राजकीय सपोर्ट हवा,या निवडणुकीत एकजुटीने रहा,लोकसभेत थोडी टक्केवारी घसरली ती वाढवा आणि अनिल दादांना विजयी करा असे आवाहन त्यांनी केले.
सी ए नीरज अग्रवाल यांनी या भूमीत विकास आणि चांगलं खात पाहिजे असेल तर अनिल दादाना मताधिक्य द्यावे असे आवाहन केले,
ऍड राजेंद्र अग्रवाल यांनी आपण अमळनेर प्रेमी आहोत, मंत्री अनिल पाटील विकासाचा मंत्र घेऊन पुन्हा लढवित आहेत,दहा वर्षे पूर्वीचे अमळनेर आणि आताचे अमळनेर फरक आहे,सर्वांगीण विकास होत आहे,प्रवाहाच्या दिशेने चालले पाहिजे,पुढील पाच वर्षात अमळनेर मेट्रो सिटी सारखे राहील,धरण पूर्ण झाल्यावर कायापालट होईल अशी ग्वाही दिली.आयएमए चे अध्यक्ष डॉ प्रशांत शिंदे यांनी आपल्या भूमीचे नाव बिकानेर न होता पावन भूमी अमळनेर असे करायचे आहे,हे अमळनेर नगरीचे स्पीच आहे येथे बॅट्समन,बॉलर आणि फिल्डर देखील आपलाच पाहिजे,कोणता डॉक्टर चांगला हे आपल्याला कळते तसे चांगला लोकप्रतिनिधी म्हणून अनिल दादांना त्याला निवडून द्या असे आवाहन त्यांनी केले.
माजी नगराध्यक्ष सुभाष चौधरी यांनी आपल्या धरणाच्या मिळालेल्या सुप्रमाला हे खोटे म्हणतात पण ही खूप कठीण गोष्ट आहे,अनिल दादांच्या प्रयत्नाने हे धरण लवकरच केंद्राच्या योजनेत संमाविष्ठ होईल,हे धरण झाले तर अमळनेर राज्यात नंबर एक वर होईल,पाच तालुके समृद्ध होणार असे त्यांनी सांगितले. बजरंग अग्रवाल यांनी आपल्याला अनिल दादा ला कसे निवडून आणायचे ते ठरवायचे आहे,हे इतरांना पण सांगा,आपलं टिकवायचे असेल अनिल दादाच पाहिजे असे त्यांनी सांगितले.
यावेळी मंचावर बजरंगशेठ अग्रवाल, हरी भिका वाणी, विनोद भैया पाटील, सुभाष चौधरी, हिंदुजा शेठ, डॉ.प्रशांत शिंदे, मुक्तर खाटीक, नीरज अग्रवाल, डॉ.विशाल बडगुजर, अजय हिंदुजा, दिनेश कोठारी, पंकज साळी आदी मान्यवर व्यासपीठ वर उपस्थित होते, सूत्रसंचालन शरद सोनवणे यांनी केले.सभेत महिला व पुरुष बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.