पोलादी मनगटे लीसन कुस्ती खेवाले नहीं जान शे दादा

मर्दानी छातीचा पोलादी मनगटाचा मर्द साडेचार वर्ष कुठे होता गायब..

माजी पंचायत समिती सदस्य निवृत्ती बागुल यांनी उपस्थित केला प्रश्न

अमळनेर:  विधानसभा निवडणूक ही लोकशाही मजबूत करणारी निवडणूक असून कोणताही कुस्तीचा आखाडा नाही. याचे भान उमेदवाराला नाही. त्यामुळेच “मर्दानी छातीचा पोलादी मनगटाचा” असे गाणे प्रचारात वाजवून मतदारांमध्ये भिती पसरवत आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने याकडे लक्ष देऊन अशा भितीयुक्त प्रचाराला आळा घातला पाहिजे. साने गुरुजींची कर्मभूमी असलेल्या अमळनेर नगरीत असे प्रचारतंत्र आतापर्यंत कोणत्याही उमेदवाराने वापरले नव्हते, मात्र बाहेरून आलेल्या ह्या ढुस उमेदवाराने विकासाचे कोणते मुद्दे नसल्याने हा किळसवाणा प्रकार चालवलेला आहे. तर हा मर्दानी छातीचा पोलादी मनगटाचा दादा साडेचार वर्ष कुठे गायब होता, याचे जनतेला उत्तर द्यावे अशी मागणी निवृत्ती बागुल यांनी केली आहे.
शहरात एका उमेदवाराच्या समर्थनार्थ गाणे वाजवत रिक्षा फिरत असून “मर्दानी छातीचा पोलादी मनगटाचा” असे गाण्याचे बोल आहेत. ही लोकशाहीची निवडणूक आहे. येथे कुस्त्या खेळायच्या नाहीत. तर निकोप आणि निर्भिड पद्धतीने मतदान होणे आवश्यक आहे. असे पोलादी मनगटे ली सन कुस्ती खेवाले नहीं जान शे दादा, मातर हाऊ पैलवान दादा साडे चार वरिश कोणता आखाडा मा व्यायाम करी राहिना होता ? असा प्रश्न आते भोळी भाबडी जनता विचारू लागली आहे. निवडी येवाना पहिलज हाऊ मनगटे दाखाडी ऱ्हायना, निवडावर हा शड्डू भी ठोकी, त्यामुळे असा उमेदवारले मत देवाना पहिले मतदारेसनी विचार कराले पाहिजे, असे सुज्ञ नागरिक चौका-चौकात बोलू लागले आहेत. अमळनेर ही सखाराम महाराजांची पुण्यभूमी आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेचा विकास करणारा विकास पुरूष पाहिजे, नागरिकांना भिती घालणारा नको, तालुक्याला विधानसभेतून मतदार संघासाठी निधी आणणारा आमदार हवा असून तालुक्याने ढुस बुद्धी काय असते याचा अनुभव मागे पाच वर्ष घेतला आहे, त्यामुळे जनता शहाणी झाली आहे. ते मतदानाच्या दिवशी आपला अधिकार दाखवून देतील, आणि भूमिपुत्र मंत्री अनिल पाटील यांनाच निवडून देतील, असा विश्वासही बागुल यांनी व्यक्त केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

[democracy id="1"]