शहरातील सर्वच प्रभागात मंत्री अनिल पाटील यांची प्रचार रॅली प्रतिसादामुळे ठरतेय लक्षवेधी

भूमिपुत्र व विकास पुरुष म्हणून संपुर्ण शहरात अनिल दादांनाच पसंती- गोपी कासार व नरेंद्र चौधरी

अमळनेर: शहरातील सर्वच प्रभागात महायुतीचे उमेदवार मंत्री अनिल भाईदास पाटील यांचा प्रचार दौरा प्रचंड प्रतिसादामुळे लक्षवेधी ठरत असून जिथे तिथे या रॅलीचीच चर्चा होत आहे,भूमिपुत्र व विकास पुरुष म्हणून संपुर्ण शहरात अनिल दादांना पसंती मिळत असल्याची भावना माजी उपनगराध्यक्ष गोपी कासार व माजी नगरसेवक नरेंद्र चौधरी यांनी व्यक्त केली.
रॅली प्रसंगी आपल्या भावना व्यक्त करताना ते म्हणाले की असा एक प्रभाग नाही जेथे अनिल दादांच्या रॅलीने गर्दीचा उच्चांक गाठला नाही,आम्ही पहिल्या दिवसांपासून प्रत्येक प्रभागाच्या रॅलीत सहभागी असून प्रत्येक प्रभागात गर्दी वाढत आहे.,लोक स्वयंस्फूर्तीने यात सहभागी होऊन समर्थन देत आहेत. प्रत्येक प्रभागात महिला भगिनींची औक्षण करण्यासाठी रीघ लागत असून गल्लोगल्ली फटाक्यांच्या आतिषबाजीने स्वागत केले जात आहे.एकंदरीत सारे शहरच अनिल पाटील यांचे समर्थन करीत असल्याचे हे चित्र असून कदाचित संपूर्ण शहरातून रेकॉर्ड ब्रेक मतदान होईल आणि मोठे मताधिक्य त्यांना मिळेल असेच चित्र आज तरी दिसत आहे.
मंत्री अनिल पाटील यांनी शहर व ग्रामिण भागात केलेल्या उल्लेखनीय विकास कामांमुळे हा प्रतिसाद असून विशेष करून बाजार पेठेत झालेले सर्व रस्ते, गुंडगिरी कमी झाल्याने व्यापारी बांधवांचा संपलेला त्रास यामुळे व्यापारी व व्यावसायिक बांधव प्रचंड खुश आहेत. कोरोना काळात मंत्री अनिल पाटील यांनी जनतेची अहोरात्र केलेली सेवा लोक अजून विसरलेले नसून अनेक प्रभागात नागरिकांनी याबाबत भावना बोलून दाखविल्या आहेत.अनेक भागात झालेला विकास आणि मंजुर झालेली 197 कोटींची दररोज पाणी देणारी योजना यामुळे महिला वर्गही खुश आहे.
आपल्या मातीचा भूमिपुत्र म्हणूनच नव्हे तर हे भूमिपुत्र विकास पुत्र देखील असल्याने आणि त्यांना पुन्हा संधी दिल्यास मंत्री पद पुन्हा मिळुन शहराचा विकासाचा आलेख अजून वाढणार असल्याने आम्ही सर्व आजी माजी नगरसेवक एकसंघ झालो असून कोणत्याही परिस्थितीत शहरातून मताधिक्य देण्याचा निर्धार आम्ही केला आहे.जनतेने देखील विकासाला साथ म्हणून जात पात न बघता केवळ भूमिपुत्र अनिल दादा यांना साथ द्यावी आणि 20 तारखेला घड्याळं चिन्हावरच मतदान करावे असे आवाहन गोपी कासार व नरेंद्र चौधरी यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

[democracy id="1"]