साने गुरुजी नूतन विद्यालयाचे विद्यार्थी मतदार प्रबोधन दूत म्हणून घरोघरी जाऊन मतदान करण्याविषयी करित आहे जागृती

अमळनेर:  मतदानाचा जागृतीसाठी प्रबोधन दूत अमळनेर येथील साने गुरुजी नूतन माध्यमिक विद्यालयाचे विद्यार्थी मतदार प्रबोधन दूत म्हणून घरोघरी जाऊन मतदान करण्याविषयी जाणीव जागृती निर्माण करीत आहेत. संस्थेचे सचिव संदीप घोरपडे व मुख्याध्यापक सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाने व शाळेतील मतदान जागृती अधिकारी डी ए धनगर यांच्या संकल्पनेने मतदान प्रबोधन दूत नेमलेले आहेत. प्रत्येक विद्यार्थी किमान आपल्या आजूबाजूच्या 10 कुटुंबांना भेट देऊन सरासरी प्रत्येक कुटुंबातील चार व्यक्ती असे एकूण 40 मतदारांना जागृत करेल. विधानसभेच्या असलेल्या मतदानाच्या 20 तारखेला प्रत्येक मतदार जाईल व मतदान करेल याविषयी काळजी घेईल. तसेच मतदान केल्यामुळे आपली लोकशाही कशी जिवंत राहील याविषयी महत्त्व पटवून देईल. निकोप लोकशाहीसाठी मतदान करणे गरजेचे आहे त्यामुळे विधानसभेत आपल्या आवडीचा व योग्य उमेदवार निवडून देण्यासाठी आग्रह धरेल. संस्थेचे शिक्षक प्रतिनिधी विलास चौधरी, डी के पाटील, एनसीसी अधिकारी समाधान पाटील व इतर सर्व शिक्षक सदर उपक्रमासाठी मदत करणार आहेत. साधारण 20000 मतदारापर्यंत जाणीव जागृती पोहोचेल अशी व्यवस्था करण्यात आलेली आहे. यामुळे मतदानाचा खालावलेला टक्का वाढीसाठी निश्चितपणे मदत होणार आहे. तसेच विद्यार्थ्यांमध्ये संभाषण कौशल्य विकसित होऊन त्यांच्या व्यक्तिमत्वावर सकारात्मक परिणाम होईल, व्यक्तिमत्व विकास होईल व प्रत्येक विद्यार्थी बहिर्मुख होईल. त्यांच्यात आपले म्हणणे पटवून देण्याची क्षमता विकसित होईल यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे. सदर उपक्रमाचे कौतुक उपविभागीय अधिकारी नितीनकुमार मुंडावरे साहेब , तहसीलदार रुपेश कुमार सुराणा साहेब, निवडणूक नायब तहसीलदार प्रशांत धमके साहेब, संस्थाध्यक्ष हेमकांत पाटील, नितीन ढोकणे, सर्कल पुरुषोत्तम पाटील व गटशिक्षणाधिकारी रावसाहेब पाटील यांनी अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

[democracy id="1"]