गेल्या दहा वर्षांत धरणात किती पाणी अडवले ? आजी माजी आमदारांनी उत्तर द्यावे,

डॉ. अनिल शिंदे यांचे आव्हान, २०१४ पासून धरणाच्या पाणी साठ्यात वाढ नाही,

अमळनेर: २०१४ पासून पाडळसरे धरणाच्या पाणीसाठ्यात किती वाढ झाली हे सांगावे असे आव्हान डॉ. अनिल शिंदे यांनी आजी माजी आमदारांना दिले आहे.
आघाडी सरकारच्या काळात २०१०-११ ते २०१४-१५ या काळातील अर्थसंकल्पात मिळालेल्या निधीतून माजी आमदार साहेबराव पाटील यांच्या कार्यकाळात प्रत्यक्ष नदीपात्रात काम करून दोन टीएमसी पाणी अडवण्यात आले होते. त्यामुळे १७ किमी बॅकवॉटर साचून काठावरच्या गावांचा पाणीप्रश्न सुटला होता. तसेच कलाली डोहात ही पाणी साठल्याने शहराचा पाणीपुरवठा सुरळीत सुरू झाला. मात्र त्यानंतर शिरीष चौधरी यांच्या काळात धरणाच्या कामात भरीव भर पडली नाही. आणि मंत्री अनिल पाटील यांच्या काळात ही केवळ स्थापत्य काम आणि यांत्रिकी काम यावर भर देण्यात आला. मात्र त्यानंतर शिरीष चौधरी यांच्या काळात धरणाच्या कामात भरीव भर पडली नाही. आणि मंत्री अनिल पाटील यांच्या काळात ही केवळ स्थापत्य काम आणि यांत्रिकी काम यावर भर देण्यात आला. मात्र आघाडी सरकारच्या काळात अडकलेल्या पाण्यात एक थेंब ही वाढ झाली नाही. धरणाचे भरीव काम फक्त आघाडी सरकारच्या कार्यकाळातच होऊ शकते असे सांगत आजी माजी आमदार सिंचनप्रश्र्नी फक्त दिशाभूल करत असल्याचे डॉ अनिल शिंदे यांनी सांगितले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

[democracy id="1"]