‘बाप दाखव नाहीतर श्राद्ध घाल’गावाचा रस्ता पाच वर्षात दोनदा तरीही खस्ता

अमळनेर : ‘बाप दाखव नाहीतर श्राद्ध घाल’ या म्हणीचा खरा अर्थ अमळनेर विधानसभा मतदारसंघातील आक्रमक मतदारांनी उदाहरणासह सांगितला आहे. २५०० कोटींचा निधी आणला मग डोळ्याला दिसेल असे काम दाखव असा जाब अिनल पाटील यांना गावोगावी आणि जागोजागी विचारला जात आहे. आपल्या पाच वर्षाच्या कार्यकाळात अमळगाव ते हिंगोणे या रस्त्याचे काम दोन वेळा केले तरीही हालत खस्ता असल्याचे सांगत चांगलेच तोंडावर पाडले जात आहे.

पावसाळ्यात अमळगाव, दोधवद आणि हिंगोणे येथील ग्रामस्थांची या रस्त्यामुळे त्रेधातिरपीट उडाली. शेतकऱ्यांची ससेहोलपट झाली. आणि कळस म्हणजे पाच वर्षांच्या कार्यकाळात या रस्त्याचे दोन वेळा काम करण्यात आले तरी मंत्री महोदयांच्या गावाला जाणारी वाट िबकटच आहे. इतक्या कोटींचा निधी आणला आणि तितक्या कोटींचा निधी आणला या वल्गना वांझोट्या आहेत. पाच वर्षाच्या कार्यकाळात ज्या काही मोजक्या पाणंद रस्त्यांची कामे झाली ती अतिशय निकृष्ठ आणि तकलादू झाल्या. अमळगाव हिंगोणे रस्ता केवळ झाकी आहे मतदारसंघात फिराल तर चित्र खूपच वाईट आहे.

अमळगाव येथे राजवाड्यालगत शेतात उभारण्यात आलेले प्रवेशद्वार कोसळले. त्यानंतर पुढे काय झाले याचा पत्ता नाही. आज या दरवाज्याचे अवशेषही शिल्लक नाहीत. मग या परिसरात झालेल्या कामांवरील निधी मुरला कुठे? असा प्रश्न विचारला जात आहे. ज्या अमळगाव गटाने राजकारणात तुमचा श्रीगणेशा करून दिला त्या गटाला तोंडाला तुम्ही पाने पुसली. गावाने नाकारलेल्या लोकनियुक्त भ्रष्टाचाऱ्यासह चांडाळ चौकडीला तुम्ही सोबत मिरवत असून हे दृश्य पाहूनच लोक आपसूचक तोंडे फिरवत आहेत.

दुष्काळाच्या अस्मानी संकटाशी येथील शेतकरी झुंजत असताना तुम्ही त्यांच्यावर सुल्तानी संकट लादले. पिक विमासाठी तरसावले. तालुक्याला दुष्काळ यादीतून वगळले. त्यामुळे शेतकरी आणि शेतीनिर्भर घटकाचा तळतळाट होत असून रॅलीत नाही, भाषणालाही कोणी उभे राहुने तुमच्या चाटा ऐकायला तयार नाही. जनतेचा अपेक्षाभंग आणि भ्रमनिराश झालेला असून फाटका असला तरी चालेल पण तोंडाचा सुटलेला नको अशी मानसिकता अमळनेर मतदारसंघवासीयांची झालेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

[democracy id="1"]