अनिलदादाही निवडणार आणि सरकारही बसणार खासदार स्मिता वाघ

उदय बापू गेल्यानंतर ताई संपली असे म्हणणाऱ्यांना गिरिषभाऊ यांनी दिली चपराक

अमळनेर :- लोकसभा निवडणुकीतही आपण एकत्र लढलो मंत्री अनिल पाटील यांच्या मतदारसंघात 71 हजारांचा लीड स्मिताताईना मिळाला,आता उपकाराची परतफेड म्हणून अमळनेर विधानसभा निवडणुकीत तुम्हाला 71 हजार पेक्षा जास्त मतांनी आमदार नव्हे तर मंत्री निवडून द्यायचा आहे. जेव्हढा जास्त लीड तेवढे मजबुत खाते अनिल पाटलाना मिळेल. त्यामुळे २० तारखेला घड्याळ चिन्हाचे जास्तीत जास्त बटन दाबून महायुतीला निवडून आणा असे आवाहन मंत्री गिरीश महाजन यांनी अमळनेर येथील महायुतीच्या बूथ कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात केले. यावेळी महायुतीचे कार्यकर्ते हजारोच्या संख्येने उपस्थित झाल्याने संपूर्ण मैदान हाऊस फुल्ल झाले होते.यानिमित्ताने अनिल पाटील यांच्या मागे मोठी ताकद उभी असल्याचे स्पष्ट झाले.11 रोजी सायंकाळी बन्सीलाल पॅलेस मध्ये हा मेळावा आयोजित करण्यात आला होता. लोकसभेला एकत्र असल्याने ७१ हजाराचा लीड मिळाला आता उपकाराची परत फेड करायची वेळ भाजपची आहे. आम्ही तुमच्याकडे मतदार म्हणून नव्हे तर परिवार म्हणून पाहतो. विकास कामे हीच आपली जात समजायची.अनेक या निवडणुकीत अनेक मेळावे पाहिले पण एवढा मोठा मेळावा कुठेच पहिला नाही.केंद्र आणि राज्याने अनेक योजना सुरू केल्या असून त्या सुरू ठेवायच्या असतील तर महायुतीचे सरकार आलेच पाहिजे, जळगाव जिल्ह्यात संपूर्ण 11 जागांवर विजय मिळविण्याचा आपला संकल्प असल्याचे त्यांनी सांगितले.

अनिलदादाही निवडणार आणि सरकारही बसणार खासदार स्मिता वाघ म्हणाल्या की अमळनेरची जनता विकासाच्या मागे उभी राहणारी आहे. उदय बापू गेल्यानंतर ताई संपली असे म्हणणाऱ्यांना गिरिषभाऊ यांनी चपराक दिली. भाऊंनी मला खासदार बनवले. मी आणि अनिलदादा पाडळसरे धरणाचा विडा उचलला असून धरण आम्ही पूर्ण करणार आहोत. याठिकाणी अनिल दादा पण निवडणार आणि आपले सरकार पण बसणार फक्त आपण प्रत्येकाने आपल्या गावात व बुथवर जास्तीत जास्त मतदान काढावे असे त्यांनी सांगितले.

जमलेली गर्दीच विजयी मिरवणुकीचा संदेश देणारी

मंत्री अनिल पाटील म्हणाले की आज जमलेली प्रचंड गर्दी 23 तारखेला विजयी मिरवणुकीचा संदेश देणारी असून अमळनेरच्या कार्यकर्त्याला कामासाठी कोणाच्या वशिल्याची गरज नाही.मी आणि स्मिताताई महायुतीच्या कार्यकर्त्यांची जवाबदारी घेत आहोत. आम्ही त्यासाठी तत्पर आहोत. मागच्या काळात गुंडगिरी वाढली होती ,तरुण दारूच्या आधीन झाले होते. ही संस्कृती मोडून काढायची आहे. भाषण चालू असताना अचानक अनिल पाटील यांनी लाव रे तो व्हिडीओ म्हणत अमळनेर येथील राजमाता जिजाऊ सुतगिरणीला मिळालेला पैसा कोल्हापूर कडे कसा वळवला गेला. घोटाळा झाल्याचे दाखवून भावनिक आवाहन व्हिडीओ द्वारे करण्यात आले. या घोटाळ्याची चौकशी करण्यात यावी अशी मागणी अनिल पाटील यांनी ना महाजन यांच्याकडे केली. गिरीश महाजन यांनी जळगाव जिल्ह्यातील विविध मंदिरांसाठी ५०० कोटींचा निधी दिल्याचेही अनिल पाटील यांनी सांगून निवडून देण्याचे आवाहन केले.
यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष जळकेकर महाराज यांनी सांगितले की भाजप ,शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे तीन पक्ष म्हणजे घड्याळाचे तीन काटे आहेत. ते एकत्र आले म्हणजे बारा वाजतात. येत्या २० तारखेला एकत्र येत घड्याळाचे बटन दाबा म्हणजे विरोधकांचे बारा वाजतील.
यावेळी सेना जिल्हाध्यक्ष निलेश पाटील ,राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष संजय पवार , रिपाई चे यशवंत बैसाणे , देविदास देसले ,गौरव महाजन , रामकृष्ण पाटील , अरुण पाटील,दिनेश शेलकर आदींनी आपले मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन शरद सोनवणे यांनी केले. अनिल पाटील यांच्या मदतीला भाजप सरसावली असल्याने मेळाव्यास प्रचंड गर्दी होती.
यावेळी मंचावर माजी जि प सदस्य ऍड व्ही आर पाटील, माजी नगराध्यक्ष सुभाष चौधरी, सौ जयश्री अनिल पाटील, विनोद भैय्यां पाटील, भारती सोनवणे, प्रवक्ता योगेश देसले, भाजप तालुकाध्यक्ष हिरालाल पाटील, शहराध्यक्ष विजय राजपूत, सेना तालुका प्रमुख प्रथमेश पवार, शहर प्रमुख संजय पाटील, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष भागवत पाटील, शहराध्यक्ष मुक्तार खाटीक तसेच सर्व महायुतीचे पदाधिकारी, मार्केट पदाधिकारी व सर्व माजी नगरसेवक उपस्थित होते. मेळाव्याला महिलांची संख्याही लक्षणीय होती. सूत्रसंचालन शरद सोनवणे यांनी केले.

अमळनेर मतदारसंघात भाजपाचा कुणीही डमी उमेदवार नाही

ना गिरीश महाजन यांनी शिरीष चौधरी यांचे नाव न घेता आमचे डमी उमेदवार म्हणून अफवा पसरवली जात आहे. मात्र आम्ही त्यांची हकालपट्टी केली आहे. आमचा उमेदवार अनिलदादाच आहे. आपली ताकद त्यांच्याच पाठीशी उभी करून त्यानाच निवडून द्यावे असे आवाहन ना महाजन यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

[democracy id="1"]