अध्यक्षांनी स्वार्थासाठी समाजबांधवांच्या हक्कावर गदा आणू नये
भूमिपुत्र म्हणून आम्ही अनिल पाटलांसोबतच, राजपूत समाज बांधवांनी व्यक्त केल्या भावना
अमळनेर: तालुक्यात सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमांच्या उद्देशाने निर्माण झालेल्या अमळनेर तालुका राजपुत एकता मंचचा राजकीय वर्तुळाशी काहीही संबंध असून मंचच्या अध्यक्षांनी वैयक्तिक स्वार्थासाठी समाजबांधवांच्या हक्कावर गदा आणू नये.कोणताही निर्णय घेण्यास समाजातील प्रत्येक जण सक्षम असल्याच्या भावना राजपूत समाज बांधवांनी व्यक्त केल्या आहेत.
यासंदर्भात भरतसिंग पाटील, खोकरपाट, मच्छीन्द्र पाटील, खडके, प्रकाश भीमसिंग पाटील, आटाळे, पिंटू राजपुत, कलमसरे, विजयसिंग राजपुत कुर्हे, जयदीप पाटील,खडके, कुणालसिंग राजपुत, दोधवत, भरतसिंग पाटील दरेंगाव, लोटनसिंग राजपूत , कळंबु,सुनिल विठ्ठल पाटील,मोहाडी, प्रकाश बारकू पाटील,दहीगाव, गुलाबीसिंग जुलाल पाटील, पुनमचंद सुपडू राजपूत, समाधान नारायण पाटील,कुर्हे खुर्द,, सुरजसिंग परदेशी, अमळनेर, विजय राजपुत, अमळनेर, आदींनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की दोन दिवसांपूर्वी अमळनेर येथे राजपुत समाज बांधवांचा मेळावा होऊन त्याठिकाणी स्वयंस्फूर्तीने शेकडोंच्या संख्येने आलेल्या समाज बांधवांनी भूमिपुत्र व विकासाचे मोठे व्हिजन म्हणून महायुती चे उमेदवार अनिल भाईदास पाटील यांना समर्थन देण्याचा निर्णय घेतला असून शेकडो बांधवांचा तो निर्णय आहे.आमच्यासह अनेक समाज बांधव जाहीरपणे प्रचार कार्यातही लागले आहेत.अमळनेर तालुक्यात राजपुत समाजाची 22 तर संपूर्ण मतदारसंघात 26 ते 27 गावे असून प्रत्येक गावात आमच्या सारखी मंडळी राजकीय वर्तुळात असल्याने गावं पातळीवर आमच्यासाठी कोणता उमेदवार योग्य आणि कोणता अयोग्य याचा निर्णय घेण्याचा आम्हाला पुर्णपणे अधिकार आहे. केवळ समाज म्हणून आम्ही समर्थन देण्याचा निर्णय घेतलेला नाही.ग्रामिण भागात राजकीय व सामाजिक जीवनात काम करीत असताना केवळ समाज म्हणून आम्ही न वावरता सर्वाना सोबत घेऊन कार्य करण्याची आमची सवय आहे.आणि कुणी केवळ आपल्या स्वार्थासाठी संपूर्ण समाजाचे नेतृत्व करण्याचा प्रयत्न करीत असेल तर ते आम्ही मुळीच खपवून घेणार नाही.
राजपुत एकता मंचचे अध्यक्ष यांचा मंत्री अनिल पाटील यांच्याशी वैयक्तिक वाद असल्याने ते वैयक्तिक विरोध म्हणून चुकीच्या भूमिका मांडत आहेत. खरे पाहता अनिल पाटील यांना आमची साऱ्यांची समर्थनाची भूमिका समाज म्हणून मुळीच नसून आम्ही सारे या मातीतील माणसे असल्याने “जो आपल्या मातीचा तोच आपल्या हिताचा” हीच आमची स्पष्ट भूमिका आहे.त्यादिवशी झालेल्या मेळाव्यात शेकडोच्या संख्येने समाज बांधव स्वयंस्फूर्तीने आलेत,त्यातूनच जो संदेश जायचा तो गेला असून कुणी एक दोन लोक काहीही प्रतिक्रिया देत असतील तर त्यांना आमच्या दृष्टीने काहीही किंमत नाही हेच आम्ही यामाध्यमातून जाहीर करीत आहोत.