एच. आय. व्हीं. सह जीवन जगणाऱ्या अनाथ बालकांना सकस आहार किराणा किट वाटप

रोटरी क्लब अमळनेर आणि आधार बहुद्देशीय संस्था यांचा संयुक्त उपक्रम

अमळनेर :  दिनांक 8/11/2024 रोजी ओमकार अंध के व्ही के सोसायटी मुंबई यांच्या कडून किशोर देवरे यांनी 50 सकस आहार किट त्यांच्या स्वतःच्या खर्चातून अमळनेर येथे पार्सल द्वारे पोहचवले, व मकसुद भाई बोहरी यांच्या कडून 30 प्रोटीन किट देण्यात आले. आधार बहुउद्देशीय संस्था व रोटरी क्लब अमळनेर यांच्या संयुक्त विद्यमाने एच आय व्ही सह जगणाऱ्या अनाथ मुलांना व मुलींना तसेच गरजु व्यक्ती यांना सकस आहार कीट व प्रोटीन किट चे वाटप अंकुर सेवा सेतू अंतर्गत करण्यात आले
या कार्यक्रमाचे अध्यक्ष रो.मकसुद भाई बोहरी , रोटरी क्लबचे अध्यक्ष रो.ताहा बुकवाला, सचिव रो.विशाल शर्मा व रोटरी क्लब चे सिनियर मेंब रो. चेलाराम सैनानी व रो. डॉ दिलीप भावसार यांची उपस्थिती होती.
या उपक्रमाच्या यशस्वितेसाठी आधार संस्थेचे टीम मेंबर तौसिफ शेख ,दीपक विश्वेश्वर, उर्जिता शिसोदे, पुनम पाटील यांनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय कापडे यांनी केले व या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन रो.ताहा बुकवाला यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

[democracy id="1"]