काहींना दारू पाजून गोंधळ घालण्याचा केला जातोय निंदनीय प्रयत्न

एवढ्या खालच्या स्तरावर जाऊ नका,जिल्हाध्यक्ष भुषण भदाणे यांचा इशारा

अमळनेर -विधानसभा मतदारसंघातील काहीं गावात टवाळ खोरांना दारू पाजून गोंधळ घालण्यास प्रवृत्त करण्याचा निंदनीय प्रकार केला जात असल्याने एवढ्या खालच्या स्तरावर जाऊन आपलीच वाहवाह करून घेऊ नका,खिलाडू वृत्तीने लढा देण्याची तयारी ठेवा अन्यथा आम्हालाही सर्वच खेळ येतात असा इशारा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष भुषण भदाणे यांनी विरोधी उमेदवारास उद्देशून दिला आहे.
सद्यस्थितीत ग्रामिण भागात उमेदवारांचा प्रचार दौरा सुरू असुन उमेदवारासमोर गोंधळ घालण्यासाठी दारू वाल्या उमेदवारांकडून दारु चा डोस देऊन सोबत वेगवेगळे प्रलोभन देखील दाखवले जात आहे.काही बिनबुद्धीचे यास बळीही पडत असल्याने काही चुकीचे प्रकार होत आहेत.असेच प्रकार ही मंडळी करणार असेल तर त्यांनाही इतर गावात असाच गोंधळ अनुभवयला मिळाल्यास वाईट वाटून घेऊ नये.आम्ही लोकशाहीच्या मार्गांने निवडणूक लढविणारे असल्याने आमचे महायुतीचे उमेदवार अनिल भाईदास पाटील यांचा मार्गाने निवडणूकीच्या रिंगणात असून ग्रामिण भागात प्रत्येक गावात त्यांना अतिशय उत्तम प्रतिसाद मिळाला आहे.त्यांच्या माध्यमातून मतदारसंघात झालेला प्रचंड विकास हेच त्यांच्या विजयासाठी पुरेसे असणार आहे.
मात्र गोंधळ घालणाऱ्यानी फक्त दारु मिळते म्हणून आपल्या तालुक्याची आणि मतदारसंघाची प्रतिमा कलंकित करू नये.आणि विरोधी उमेदवारांनी देखील आपल्या स्वार्थासाठी भरकटलेल्या तरुणाईला व्यसनाधीन करून अशी वाईट प्रवृत्ती आमच्या मतदारसंघात मुळीच रुजवू नये अन्यथा डाव उलटवायला वेळ लागणार नाही असा इशारा भदाणे यांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

[democracy id="1"]