अमळनेर : महाविकास आघाडीचे तथा काँग्रेसचे उमेदवार डॉ. अनिल नथ्थू शिंदे यांनी आज १ नोव्हेंबर 2024 रोजी अमळनेर शहरामध्ये प्रचारासाठी विविध भागांत संपर्क साधला. भागवत रोड, बस स्थानक, बाजारपेठ, दगडी दरवाजा, आणि भाजी मार्केट या सर्व ठिकाणी व्यापारी बांधव आणि भगिनींशी संवाद साधत, डॉ. शिंदे यांना साथ देण्याचे आवाहन कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी केले.
“साथ हवी लढायला, आशीर्वाद हवे जिंकायला,” या मंत्रेसह महाविकास आघाडीचा विकास महाराष्ट्राला कसा साधता येईल, याबद्दल चर्चा करण्यात आली. शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळवणे, बेरोजगारीच्या समस्यांवर मात करणे, कायदा व सुव्यवस्था सुधारणे, आणि राज्यातील फोडाफोडीच्या राजकारणाला पूर्णविराम देण्याबद्दल अवगत करण्यात आले.
डॉ. अनिल शिंदे यांना वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञ डॉक्टर असल्याबद्दल माहिती देत, सामाजिक व राजकीय क्षेत्रातील त्यांच्या अनुभवाचा उल्लेख करण्यात आला. त्यांचे वरिष्ठ पातळीवर पक्षातील पदाधिकाऱ्यांशी चांगले संबंध आहेत, ज्यामुळे अमळनेर तालुक्याला अचूक फायदा होऊ शकतो.
महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी भावनिक आवाहन केले की, “अमळनेर तालुक्याच्या विकासासाठी सर्व स्तरातील बांधव भगिनींनी माझ्या पाठीशी उभे राहावे.” असे सांगितले.
डॉक्टर शिंदे यांना शहरांमध्ये चांगला प्रतिसाद मिळत आहे, ज्यामुळे महाविकास आघाडीच्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ही शहरातील सामाजिक व राजकीय परिवर्तनाची एक सकारात्मक झलक दर्शवते आणि डॉ. अनिल शिंदे यांना यशस्वी होण्यासाठी आवश्यक समर्थन मिळविण्यात मदत करेल. असे बोलले जात आहे..