जळगाव : 28 व 29 सप्टेंबर 2024 अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित भव्य सांगता समारंभ अधिवेशन जैन हिल्स गांधी तीर्थ कस्तुरबा हॉल येथे संपन्न झाले. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून अखिल भारतीय ग्राहक पंचायत चे संस्थापक सदस्य डॉ.अशोक काळे तर सुवर्ण महोत्सवी सोहळ्याचे उदघाटक म्हणून प्रांताध्यक्ष श्री बाळासाहेब औटी तर प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय कार्यकारिणी सदस्य व माजी प्रांताध्यक्ष धनंजयजी गायकवाड ,केंद्रीय कार्यकारिणी सदस्य श्री विजयजी सागर ,जळगाव महानगरपालिकेचे मा.महापौर श्री आश्विन सोनवणे ,माजी खासदार डॉ.उल्हास पाटील यांची सुकन्या भा. ज.पा.महिला युवा नेत्या डॉ.केतकी पाटील , आमदार राजू मामा उर्फ सुरेश भोळे ,प्रांत उपाध्यक्ष विलास लेले प्रांत संघटक श्री प्रसादजी बुरांडे ,प्रांत सचिव संदीपजी जगंम,प्रांत सहसचिव विलास जगदाळे ,कोषाध्यक्ष विनोद भरते ,प्रांत समन्वयक दीपक इरकल राज्य अभ्यास मंडळ आयाम प्रमुख ॲड.तुषार झेंडे पाटील,
प्रांत जागरण आयाम प्रमुख श्री विजय जी मोहरीर प्रांत महिला प्रमुख ॲड.भारती अग्रवाल,प्रांत सदस्य उर्मिला येळगावकर , राजश्री दीक्षित केदार नाईक ,तसेच आयोजन समिती प्रमुख व जिल्हाध्यक्ष डॉ.अनिल देशमुख,जिल्हा संघटक ॲड.सुभाष जी तायडे , जिल्हा सहासंघट मकसुद बोहरी , जिल्हा सचिव श्री जगन्नाथ तळेले,जिल्हा सहसचिव सतीश देशमुख, जिल्हा उपाध्यक्ष दिनेश तायडे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रारंभ सुश्राव्य आवाजात सौ.ज्योती भावसार ,सौ.वनश्री अमृतकर व ॲड. भारती अग्रवाल यांनी ग्राहक गीत गायनाने व मान्यवरांचे हस्ते स्व. बिंदुनाना माधव जोशी संस्थापक अध्यक्ष , श्री स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमा पूजन व दीपप्रज्वलनाने झाली. याप्रसंगी स्व.भालचंद्र पाठक प्रांत उपाध्यक्ष यांनाभावपूर्ण श्रद्धांजली देण्यात आली.
जिल्हाध्यक्ष डॉ.अनिल देशमुख यांनी सर्व उपस्थितांचे मनःपूर्वक हार्दिक स्वागत करीत जळगाव सुवर्ण नगरीत संपन्न होत असलेल्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित अधिवेशन बद्दल आनंद व्यक्त करीत जळगाव जिल्ह्याची सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक प्रगतीस्थान याचा व अखिल भारतीय ग्राहक पंचायत चे जिल्ह्यातील गौरवपूर्ण कार्याचा उल्लेख करीत मध्य महाराष्ट्र प्रांतातून पुणे,बारामती,अहमदनगर, कोल्हापूर नासिक,धुळे नंदुरबार आदी ठिकाणाहून अधिवेशनात उपस्थितीत उपस्थित कार्यकर्त्यांचे हार्दिक स्वागत करण्यात आले.
प्रांत्याध्यक्ष बाळासाहेब औटी यांनी अखिल भारतीय ग्राहक पंचायतची गेल्या पन्नास वर्षातील वेगवान प्रगती उत्पादनात वाढ ,वितरणात समानता व उपभोगावर संयम असा मूलमंत्र अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे संस्थापक अध्यक्ष स्व. बिंदूमाधव जोशी यांनी संपूर्ण देशाला व जगाला देत संपूर्ण देशात ही ग्राहक चळवळ उभी केली. असा प्रगती
आलेखाचा लेखा जोगा सादर करीत त्यांच्या अथक प्रयत्नातून देशभरात अंमलात आलेला ग्राहक संरक्षण कायदा,न्यायालयीन मंच ,संरक्षण परिषद यांची झालेली स्थापना व झालेली प्रगती यावर विस्तृत मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून आपले विचार व्यक्त करताना डॉ.केतकी पाटील यांनी अखिल भारतीय ग्राहक पंचायत चे गेल्या पन्नास वर्षातील कार्य हे नेत्रदीपक असून सर्वानाच थक्क करणारे असल्याचे प्रतिपादन केले.प्रमुख पाहुणे जळगाव चे माजी महापौर श्री आश्विन जी सोनवणे यांनी अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे कार्य हे जनजागृती व समाज प्रबोधनाचे आहे असेअधोरेखित केले.
या प्रसंगी दैनिक यावल समाचारचे संपादक बाळकृष्ण वाणी यांनी संपादित केलेल्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त पुरवणी अंकाचे प्रकाशन मान्यवरांचे हस्ते करण्यात आले.
आपले अध्यक्षीय मनोगतात डॉ.अशोक काळे संस्थापक अध्यक्ष यांनी उत्कृष्ट आयोजन बद्दल आयोजक यजमान जळगाव जिल्ह्याचे सर्व टीम चे मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन करून पुढील डायमंड जुबली व शताब्दी कडे जात असताना अधिक दैदिप्यमान इतिहास निर्मिती करून शोषण मुक्त समाजाचे बिंदूनाना जोशी यांचे स्वप्नपूर्ती करावी म्हणूनही आवाहन केले.
सुवर्ण महोत्सवी वर्ष सांगता समारंभ यशस्वितेसाठी जिल्हाध्यक्ष डॉ.अनिल देशमुख,जिल्हा संघटक ॲड सुभाष तायडे,जिल्हा सचिव श्री जगन्नाथ तळेले, जळगाव जिल्हा सहसांघटक मकसुद बोहरी जळगाव जिल्हा प्रांत प्रतिनिधी श्री विजय मोहरीर , ॲड.भारती अग्रवाल ,जळगाव महानगर महिला संघटक श्रीमती विद्याताई राजपूत, जळगाव महानगर अध्यक्ष ॲड.देवेंद्र जाधव, ॲड.सीमा जाधव अमळनेर चे तालुका अध्यक्ष स्मिता चंद्रात्रे ,सौ.ज्योती भावसार ,वनश्री अमृतकर, , सौ. मेहराज भाभी बोहरी सौ.कपिला मुठे ,महेश पाटील , सतीश देशमुख महेश कोठवदे,सुनील वाघ ,विजय शुक्ला ,नरेंद्र पाटील ,सादिक कादिर
पाचोरा तालुका अध्यक्ष श्री संजय पाटील,श्री सुधाकर पाटील ,श्री गिरीश दुसाने,श्री निलेश सूर्यवंशी डॉ.दिनेश सोनार ,डॉ.मुकुंद सवानेरकर , आदींनी तसेच चाळीसगाव तालुका अध्यक्ष श्री रमेश सोनवणे,संघटक आनंदराव साळुंखे आदी मान्यवरांनी बहुमोल परिश्रम घेतलेत.
ॲड.सुभाष तायडे जिल्हा संघटक यांनी आभार व्यक्त केलेत तर कार्यक्रमाचे सूत्र संचालन सौ.ज्योती भावसार , नयना आभाळे पुणे व सौ.स्मिता चंद्रात्रे यांनी केलेत.
संध्याकाळचे सत्रात पोलिस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांचे सायबर क्राईम कार्यालयीन पोलिस उप निरीक्षक श्री दिगंबर थोरात व नाईक यांनी सायबर क्राईम या विषयावर ग्राहकाची फसवणूक होऊ नये म्हणून घ्यावयाची काळजी ,ग्राहक फसवणूक कशी होते यावर विस्तृत मार्गदर्शन केले व उपस्थितांचे प्रश्र्नास समर्पक उत्तरे ही दिलीत.तसेच राज्य परिवहन विभाग प्रमुख भगवान जगनुर यांचे प्रतिनिधी जळगाव चे डेपो व्यवस्थापक संदीप पाटील यांनी परिवहन चे ग्राहक हितार्थ असलेल्या असंख्य योजना ,अद्यावत साधन सामुग्री येणारी ई बस सेवा , शिवाई बस सुविधा अशा अनेक सुख सोयींनी युक्त माहिती देत बहुमोल मार्गदर्शन केले.
समरोपाचे दुसरे दिवशी राज्य अभ्यास मंडळ चे प्रमुख ॲड.तुषार झेंडे पाटील यांनी ग्राहक कायदा ,संरक्षण परिषद व मध्यस्थ पॅनल सदस्य यावर तसेच संस्थापक सदस्य डॉ.अशोक काळे यांनी वैद्यकीय क्षेत्रात सिझरियान चे वाढते प्रमाण या विषयी चिंता व्यक्त करीत नैसर्गिक प्रसूती तंत्रज्ञान यावर विस्तृत मार्गदर्शन तर केंद्रीय सदस्य श्री विजय सागर यांनी मध्यम वर्गीय चे प्लॉट व फ्लॅट खरेदीत होणारी फसवणूक ,फ्लॅट धारक सोसायटी यांचे हक्क यावर वैद्यकीय क्षेत्रात रुग्णाची होणारी पिळवणूक यावर विजय मोहरीर तर प्रांत उपाध्यक्ष व जळगाव जिल्ह्याचे पालक विलास जी लेले यांनी ध्वनी प्रदूषण विरहित सण साजरे करण्यात यावे म्हणून आवाहन करीत पर्यावरण यावर विस्तृत मार्गदर्शन केले.
या प्रसंगी सर्व मान्यवरांचे शाल ,स्मृतिचिन्ह व बिं चदुमाधव जोशी लिखित ग्रंथ ही सप्रेम भेट म्हणून देण्यात येऊन सन्मानित करण्यात आले.
श्री संजय रतन पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानले.