अटकाव न्यूज: 22 सप्टेंबर 2024, रविवार रोजी, पुण्यक्षेत्र आळंदी येथील श्री संत ज्ञानेश्वर माऊलींच्या संजीवन समाधी मंदिरात, श्री संत ज्ञानेश्वर माऊली सेवादल , तरडगाव यांच्यातर्फे श्री ज्ञानेश्वर जयंती निमित्त आळंदीत विविध कार्यक्रम राबविण्यात आले. माऊलींच्या मंदिर सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात सामाजिक कार्य, आषाढी वारीतील सहभाग तसेच 100K subcribers चा मोठा टप्पा पार केल्याबद्दल सौ.राजश्री सुदाम बडगुजर यांचा डाॅ.गायकवाड,अडसुर सर , प्रा.फुले सर यांचे हस्ते शाल, श्रीफळ व ट्राफी देवून सत्कार करण्यात आला. त्यावेळी व्यासपीठावर मंडळाचे अध्यक्ष श्री सतिष गायकवाड व उपाध्यक्ष श्री शिवाजी गायकवाड व इतर मान्यवर उपस्थित होते . तसेच सभागृहात तरळगाव येथील भजनी मंडळातील बंधू-भगिनी ही मोठ्या संख्येने उपस्थित होते.
माऊलींच्या संजीवन समाधी मंदिरात हा सत्कार होत असल्यामुळे स्वतःला खूप भाग्यशाली समजत, सत्काराला उत्तर देतांना राजश्रीताईंनी आपली भारतीय संस्कृती खूप महान संस्कृती असून संपूर्ण जगात सर्वश्रेष्ठ संस्कृती असल्याचे सांगितले .आपल्याला खूप थोर अशी संत परंपरा लाभलेले आहे ,आपले सण,उत्सव, संस्कृती सारेच काही खूप छान आहे . तसेच शिक्षण व स्वच्छता या विषयावर बोलत मंडळाचे आभार मानले. आणि माऊलींच्या चरणी नतमस्तक होत आशीर्वाद घेतला.