अमळनेरातील सर्व पत्रकार संघटनांनी दिली उपस्थिती…
अमळनेर : राजमुद्रा फॉउंडेशनचे अध्यक्ष श्याम पाटील यांनी पत्रकार बांधवांना वैचारीक मेजवानी मिळावी या हेतूने, जागर लोकशाहीचा… महाराष्ट्र धर्म जागवू या…महाराष्ट्र धर्म वाढवू या…. हा एक स्तुत्य उपक्रम आज नर्मदा रिसॉर्ट येथे आयोजित केला होता. सदर कार्यक्रम हा पत्रकारांसाठी वैचारिक मेजवानी ठरला. यावेळी विचारमंचवर इतिहास अभ्यासक प्रा.डॉ.लिलाधर पाटील, अमळनेर शहर व तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष चेतन राजपुत, व्हाईस ऑफ मिडीयाचे अध्यक्ष उमेश काटे तर महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे अध्यक्ष समाधान मैराळे व राजमुद्रा फॉउंडेशनचे अध्यक्ष श्याम पाटील उपस्थित होते.
सविस्तर वृत्त असे की, अशांततामय व भययुक्त वातावरणात पत्रकारांची भूमिका ही अत्यंत महत्वाची आहे. पत्रकार आपल्या लेखणीतून नागरिकांमध्ये बदल घडवून समाजात शांतता व सलोखा प्रस्तापित करू शकतो ही ताकद ओळखून राजमुद्रा फॉउंडेशनचे अध्यक्ष श्याम पाटील यांनी पत्रकार बांधवांना निमंत्रीत करून एक आगळा वेगळा कार्यक्रम नर्मदा रिसोर्ट येथे घडवून आणल