अमळनेरात धार्मिक तेढ निर्माण होइल अशा प्रक्षोभक स्वरूपाच्या घोषणा देवुन शांतता भंग करण्याऱ्या सहा जणांवर गुन्हे दाखल

अमळनेर : येथे दि १९ रोजी शहराच्या विविध भागातुन ईद निमित्त जुलुस काढण्यात आले असता त्यामध्ये धार्मिक भावना दुखावतील अश्या घोषणा देऊन हिरवा झेंडा फडविल्या प्रकरणी गुन्हे दाखल.

सविस्तर वृत्त असे की, दि १९ रोजी अमळनेर शहराच्या विविध भागातून मुस्लीम समाजाने जुलूस काढले होते .यात मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव सहभागी झाले होते. दरम्यान शाहआलम नगर कडील जुलुस हा आखाडा मैदानाकड़े जात असतांना झामी चौक जवळ आला असता त्यावेळी मिरवणुकी्तील काही मुस्लिम तरुणांनी हिदु धर्माच्या लोकांच्या घरासमोर धर्मिक तेढ निर्माण होइल अशा स्वरूपाचे गाणी वाजवून प्रक्षोभक स्वरूपाच्या घोषणा देवुन शांतता व सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न केला व . एका अनोळखी तरूण याने गावठी पिस्तूल द्वारे दोन वेळा फायर केला व एका अज्ञात इसम याने पाकिस्तान जिंदाबाद अशा घोषणा दिल्या मुळे देशाच्या एकात्माता
आणि अखंडता धोक्यात आणण्याचे उद्देशाने चिथावणीखोर घोषणा देऊन शहरातील दगडी दरवाज्यावर हिरवा झेंडा फडकविला यामुळे हिंदूंच्या भावना दुखावल्याने जवळपास पाच ते सहा जणां विरोधात अमळनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोउपनि,भगवान शिरसाठ करीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

[democracy id="1"]