दिनांक 15 सप्टेंबर रोजी2024 रोजी , जळगाव जिल्ह्यातील ,पाचोरा तालुक्यातील, पिंपळगाव हरेश्वर या गावी अखिल भारतीय बडगुजर समाज महासमितीची वार्षिक सर्वसाधारण सभा घेण्यात आली. या सभेदरम्यान मॉ चंडिका बहुउद्देशीय संस्था व समस्त बडगुजर समाज पिंपळगाव हरेश्वर यांच्या वतीने समाजसेविका व youtuber सौ. राजश्री व प्राध्यापक श्री सुदाम बडगुजर यांचा शाल, श्रीफळ ,ट्रॉफी, पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.
*मा.श्री भगवान दत्तात्रय बडगुजर ,मुळगाव पिंपळगाव हरेश्वर , ह. मु. पुणे, यांनी परिचय करून देतांना सांगितले की राजश्रीताईंचे कार्य नेहमी समाजहितासाठी असते. तसेच त्यांनी आपल्या यूट्यूब चैनल वर पिंपळगाव हरेश्वर येथील श्री चामुंडा माता प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या चित्रकरण्याचा संपूर्ण व्हिडिओ बनवून सर्व समाज बांधवांपर्यंत पोहोचविला आणि सर्वांना तो सोहळा बघता आला. तसेच पिंपळगाव हरेश्वर येथील समाजसेवक कै.शंकरराव पवार यांनी केलेल्या कार्याबद्दल त्यांचे मित्र, समाज बांधव, गावकरी व नातेवाईक यांची मुलाखत वजा चर्चासत्र घेऊन, त्यांच्या कार्याला उजाळा दिला . जोपर्यंत युट्युब आहे तोपर्यंत हे व्हिडिओज आपण कधीही बघू शकतो. तसेच त्यांच्या यूट्यूब चैनल ने 22 सप्टेंबर रोजी 100k सबस्क्राईबर म्हणजे एक लाख सबस्क्राईबरचा महत्त्वाचा टप्पा पार केला. त्याबद्दल *युट्युब तर्फे त्यांना अवॉर्ड म्हणून सिल्वर प्ले बटन 14 सप्टेंबरला देण्यात आले.हा दुग्ध शर्करा योग साजरा करण्यासाठी व कॄतज्ञता व्यक्तकरण्यासाठी पिंपळगाव हरेश्वर येथील समस्त बडगुजर समाज बांधवांकडून हा सत्कार आयोजित करण्यात आलेला होता.
मंडळातर्फे श्री श्याम शंकरराव पवार आणि त्यांच्या धर्मपत्नी सौ सुरेखा पवार यांच्या हस्ते करण्यात आला.
मनोगत व्यक्त करतांंना सौ.राजश्री बडगुजर यांनी मॉ चामुंडा मंडळ तसेच समस्त बडगुजर समाज बांधव आणि भगिनी पिंपळगाव हरेश्वर यांचे मनःपूर्वक आभार मानत स्त्रियांनी सामाजिक कार्यात हिरीरिने सहभाग घेण्याचा सल्ला दिला .कारण स्त्रियांमध्ये भरपूर शक्ती , जिद्द, चिकाटी असते आणि ती जर समाजाच्या कामी लागली तर समाजाची उन्नती झाल्याशिवाय राहणार नाही.व समाज खऱ्या अर्थाने प्रगतीपथावर असेल असे त्यांनी सांगितले.
यावेळी व्यासपीठावर अखिल भारतीय बडगुजर समाजाचे सर्व मान्यवर उपस्थित होते.