जळगाव ( प्रतिनिधी ): शरद पवार राष्ट्रवादी डॉक्टर सेलच्या जिल्हाध्यक्षपदी डॉक्टर नलिन महाजन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. डॉक्टर सेलचे विभागीय अध्यक्ष डॉ. नितीन वसंतराव पाटील यांनी ही नियुक्ती केली आहे. डॉक्टर सेलच्या जिल्हाध्यक्षपदी डॉ. नवीन महाजन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नियुक्तीपत्र देताना निरीक्षक भास्करराव काळे, माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर, सतीश पाटील तसेच राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटील यांचे सह माजी आमदार बी.एस.पाटील, प्रदेश सरचिटणीस तिलोत्तमा पाटील, जिल्हा कार्याध्यक्ष शालिग्राम मालकर, अँड रवींद्र पाटील, वैद्यकीय आघाडीचे विभागीय अध्यक्ष डॉक्टर नितीन वसंतराव पाटील,माजी आमदार अरुण पाटील, एजाज मलिक, वाल्मीक पाटील, वंदना चौधरी हे यावेळी उपस्थित होते. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विभागीय अध्यक्ष डॉक्टर नितीन पाटील यांनी राष्ट्रवादी सेलचा प्रसार करण्यास सुरुवात केली आहे त्यांच्या या भूमिकेला चांगला पाठिंबा मिळत आहे याचा फायदा शरद पवार राष्ट्रवादी गटाला आगामी विधानसभा काळात नक्की होईल.