दुचाकीस्वार जागीच ठार
अमळनेर : तालुक्यातील चांरणीकुऱ्हे गावाजवळ अज्ञात वाहनाने शनिवारी पहाटे 1:30 ते 2 वाजेच्या सुमारास एका दुचाकीस्वारास उडवल्याची घटना घडली असून दुचाकीस्वार जागीच ठार होऊन अज्ञात वाहनचालक फरार झाला आहे.
या बाबत सविस्तर वृत्त असे की, अमळनेर तालुक्यातील चांदणी कुऱ्हे गावाजवळ रात्रीच्या सुमारास अज्ञात वाहनाने एका दुचाकीस्वारास उडवुन अज्ञात वाहनचालक फरार झाला आहे. या घटनेतील दुचाकीस्वार भटू दगा चौहान नामक इसम जागीच ठार झाला आहे. ही घटना 31 ऑगस्टच्या पहाटे 2 वाजेच्या सुमारास घडली. दरम्यान संबंधित अज्ञात वाहनचालकावर चांदणीकुऱ्हे येथील पोलीस राकेश पाटील यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.