अमळनेर: रोटरी क्लब अमळनेर व प्रताप महाविद्यालय, अमळनेर यांच्या संयुक्त विद्यमाने स्पर्ट्स डे निमित्त विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
दिनांक 29 ऑगस्ट हा देशभरात क्रीडा दिवस म्हणून साजरा आपण करत असतो. क्रीडा दिवसाचे औचित्य साधून रोटरी क्लब अमळनेर व प्रताप महाविद्यालय अमळनेर यांच्या संयुक्त विद्यमाने प्रताप महाविद्यालयात टेबलं टेनिस, बॅडमिंटन, हॉलीबॉल व चेस दोन गट, वय वर्षे 16 पर्यंत व वय वर्षे 16 चा वर. स्पर्धा दिनांक 29/08/24 रोजी असून सकाळी सर्व खेळाडूंनी 7.45 ला हजर रहावयाचे आहे. स्पर्धेसाठी कणतेही शुल्क आकारले जाणार नाही. प्रा. सचिन पाटील नं. 8055113747 व प्रा. अमृत अग्रवाल नं. 9422284680 यांच्या कडे दिनांक 28/08/24 पर्यंत नावे नोंदवायचे आहे. तरी स्पर्धेसाठी जास्तीत जास्त खेळाडूंनी सहभाग नोंदवायचे आवाहन रोटरी क्लब चे अध्यक्ष रो. ताहा बुकवाला व प्रताप महाविद्याचे प्राचार्य डॉ. ए. बी. जैन यांनी केले आहे.