व्ही. झेड. पाटील, हायस्कूल शिरूड 15 ऑगस्ट 2024 रोजी 78 वा प्रजासत्ताक दिनानिमित्त शाळेतील ध्वजारोहणाचे मान शालेय समिती उपाध्यक्ष श्री. संतोष काशीराम बोरसे यांच्या हस्ते करण्यात आले. त्या प्रसंगी शालेय समिती शिरुड हायस्कुल, गावातील विविध पदाधिकारी उपस्थित होते. तसेच स्वातंत्र्य दिनानिमित्तचे औचित्य साधून हायस्कूल ते शिरूड ग्रामपंचायत ते गावापर्यंत 300 फूट ध्वज रॅली काढण्यात आली. त्याप्रसंगी शाळेतील विद्यार्थी,विद्यार्थिनी सभाग नोंदविला. या स्वातंत्र्य दिनानिमित्त गावातील सरपंच व मा.सरपंच,उपसरपंच व सदस्य, विविध कार्यकारी सोसायटी चेअरमन व सदस्य, अंगणवाळी सेविका, आरोग्य सेविका, दत्त वाचनालय अध्यक्ष व सदस्य, दूध संघ तसेच गावातील आजी माजी पदाधिकारी, जेष्ठ ग्रामस्थ, विद्यालयाचे माजी विद्यार्थी व विविध समाजाचे सर्व मित्र मंडळ. ध्वज रॅलीमध्ये 78 वा स्वातंत्र दिनानिमित्त सहभाग नोंदविला.