अमळनेर: नुकतीच अमळनेर येथे महाराष्ट्र नाभिक महामंडळाची उत्तर महाराष्ट्र विभागीय बैठक घेण्यात आली त्यात म. ना. महामंडळाचे प्रदेश अध्यक्ष मा.श्री कल्याणराव दळे यांच्या अध्यक्षते खाली घेण्यात असून त्यात दळे सरांनी समाजाला अतिशय मोलाचे मार्गदर्शन केले. प्रदेश कार्याध्यक्ष दामोदर काका बिडवे, प्रदेश चिटणीस पांडुरंगजी भवर, प्रदेश संपर्क प्रमुख किशोर सूर्यवंशी, प्रदेश उपाध्यक्ष माऊली मामा गायकवाड, प्रदेश युवक अध्यक्ष सुरेंद्र भैय्या कावरे, भुजवळ साहेब, अनिल निकम,जळगाव जिल्हा अध्यक्ष बंटी नेरपगारे, धुळे जिल्हा अध्यक्ष भीमराव वारुळे, उत्तर महाराष्ट्रतील सर्व जिल्हा पदाधिकारी व तालुका पदाधिकारी उपस्थित होते. त्यावेळी
अमळनेर च्या भाजपा ओबीसी मोर्चा प्रदेश सचिव सौ. भारती संजय सोनवणे यांची म. ना. मंडळच्या महिला प्रदेश अध्यक्ष पदी फेर निवड करण्यात आली. तसेच उत्तर महाराष्ट्र विभागीय कार्यकारणी करण्यात आली.
सूत्रसंचलन सौ. सुलोचना महाले यांनी केले तर आभार उमाकांत निकम यांनी मानले.