

अमळनेर: शिरुड येथील व्हि. झेड. पाटील हायस्कूल येथे बारा फूट उंचीच्या 100 वृक्ष लागवडीचा कार्यक्रम तालुक्याचे तहसीलदार रुपेश कुमार सुराणा, नायब तहसीलदार प्रशांत धमके, स्पार्क इरिगेशन प्रा.लिमिटेड जळगाव चे संचालक रवींद्र लढ्ढा व सप्तशृंगी इरिगेशन अमळनेर चे संचालक बापूराव महाजन यांच्या उपस्थितीत व ग्रामविकास शिक्षण संस्था मूडी चे अध्यक्ष उदय नारायण पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. स्पार्क इरिगेशन व सप्तशृंगी इरिगेशन यांच्या दातृत्वाने 12 फूट उंचीचे शंभर वड, पिंपळ, निंब,बकुळ,कदम चे झाडे उपलब्ध करून देण्यात आली होती. कार्यक्रमाची सुरुवात तहसीलदार रुपेश कुमार सुराणा साहेबांनी वृक्ष पूजनाने केली. यावेळी नायब तहसीलदार प्रशांत धमके, संस्थाध्यक्ष उदय पाटील व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. नववीत शिकणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला तीन झाडे दत्तक देण्यात आली. जो विद्यार्थी आपण दत्तक घेतलेली झाडांचे संगोपन व्यवस्थित करेल व पाणी घालेल अशा विद्यार्थ्याला पुढच्या वर्षी म्हणजे दहावीच्या वर्षी बोर्डाची फी गावातील दातृत्वामार्फत भरणार आहे. तसेच झाडाची पूर्ण वाढ करणाऱ्या
विद्यार्थ्याला वृक्षमित्र प्रमाणपत्र देऊन सुद्धा गौरवण्यात येईल असे सांगण्यात आले. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे सचिव प्रा.भरत पाटील व जळगाव येथील उद्योजक महेश जडिए व इंजि. कुणाल गिरासे उपस्थित होते. यावेळी तहसीलदार रुपेश कुमार सुराणा साहेब यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, एक झाड आपल्याला सावली देते, मोठ्या प्रमाणावर ऑक्सिजन देते, शिवाय वातावरणातील दूषित वायू शोषून घेण्याचे कार्य करते. म्हणून प्रत्येकाने झाड लावणे आपली जबाबदारी आहे असे जाणून घेतले पाहिजे. मनोगतात डी.ए.धनगर म्हणाले की, वसुंधरा सुद्धा शोक करायला लागलेली आहे. त्यामुळे त्यांनी वसुंधरा शोक गीत अर्थ सांगितला. हा नाश थांबवा भूमातेचे तनमन जळते आहे, ही वसुंधरा जनसंख्येच्या भाराने रडते आहे. असे सांगून उपस्थितांमध्ये झाडांविषयी जिव्हाळा निर्माण करण्याचा प्रयत्न केला.

कार्यक्रमाला गावाचे सरपंच गोविंदा सोनवणे, नारायण पाटील, काळू पाटील,वसंतराव पाटील, दिलीप पाटील सर, योजना पाटील, पुंजू पाटील,विजय बोरसे,संतोष बोरसे, अतुल सोनवणे, दिलीप पाटील ,रामलाल पाटील, डॉ. के पी पाटील,सुप्रिया पाटील,यशवंत बैसाणे, नगराज पाटील,नंदकुमार अहिरे, विजय पवार,विनायक पाटील, अंकित सोनवणे, अनिल पाटील ,महेंद्र पाटील ,रजनीकांत पाटील व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक अनिल सूर्यवंशी व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती देशमुख मॅडम व आभार निकम सर यांनी केले.
राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.