कै.सु.आ पाटील माध्य.विद्या.पिंपळे बु. विद्यालयात केले शालेय गणवेश वितरण तसेच डिजिटल कक्ष उद्घाटन

अमळनेर: दिनांक.१०ऑगस्ट २०२४ ग्राम विकास मंडळ नवलनगर संचलित कै.सु.आ पाटील माध्य.विद्या.पिंपळे बु!! येथे विद्यालयाचे उपक्रमशील मुख्याध्यापक.श्री.बापूसो.एस एच भोसले सर यांच्या मार्गदर्शनाने व प्रेरणेने शालेय गणवेश वितरण तसेच डिजिटल कक्ष उद्घाटन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
याप्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी ग्रामविकास मंडळ नवलनगरचे प्रशासकीय अधिकारी श्री.भाऊसो.बी.टी.पाटील, सहा. प्रशासकीय अधिकारी श्री.दादासो.आर.एन भालेराव सर, पिंपळे खु!!गावाचे लोकनियुक्त सरपंच नानासो.युवराज पाटील , पिंपळे बु!!गावाचे उपसरपंच आबासो.योगेश पाटील होते. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते इयत्ता:-५ वी चे विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना शालेय गणेश वितरण करण्यात आले. तसेच मान्यवरांच्या हस्ते डिजिटल कक्ष(Projector room) चे उद्घाटन करण्यात आले.सहा. प्रशासकीय अधिकारी श्री.दादासो.आर.एन भालेराव सर यांच्याकडून सर्व विद्यार्थ्यांना मिष्ठान्न मध्ये जलेबी देण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.एम पी निकम सर यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि आभार प्रदर्शन वरिष्ठ शिक्षक श्री.सी एन पाटील सर यांनी केले. कार्यक्रमाप्रसंगी वरिष्ठ शिक्षक ,श्री.डी बी पाटील सर व सर्व शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी वृंद उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

[democracy id="1"]