शरदचंद्र पवार साहेब लवकरच उमेदवारी जाहीर करणार
अमळनेर : येथील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटील यांच्या अध्यक्षते खाली आढावा बैठक संपन्न झाली.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांच्या सुचने नुसार जळगाव जिल्ह्यात जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटील यांनी संपर्क अभियान अंतर्गत अमळनेर येथे तालुका पदाधिकारी यांची आढावा बैठक घेण्यात आली .याप्रसंगी प्रमोद पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले की,संपूर्ण जिल्ह्यातील चार ते पाच दिवसात प्रत्येक तालुक्याला भेट देऊन प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठक सुरू केलेल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून या ठिकाणी अमळनेरला आलो आहोत. मोरे काका, देवकर आप्पा, सतीश आण्णा,युवराज पाटील आणि रवींद्र भैय्यासाहेब जिल्हाध्यक्ष त्यानंतर आता मी त्या ठिकाणी आहे.यांची परंपरा संघटना बांधण्याची काम मी करणार आहे.जळगाव जिल्ह्यामध्ये प्रशासनावर भारतीय जनता पार्टीची दहशत आहे.ते विरोधी पक्षातील कार्यकर्त्याला आमच्याकडे याल तर तुझं काम होईल,अश्या पद्धतीने धमकावले जात आहे.भाजपाचे खासदार सी आर पाटील यांनी शरद पवार यांनी सुरू केलेली नारपार योजना रद्द करून देशातील नागरिकांचे हाल केले आहे ,याचा आमचा पक्ष निषेध करतो.पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना शरद पवार लवकरच अमळनेर च्या उमेदवारी बाबत निर्णय घेऊन जाहीर करतील असेसांगितले.जिल्ह्यात शरद पवार साहेबांच्या तीन सभा होणार असल्याचे ही त्यांनी जाहीर केले.
प्रदेश उपाध्यक्ष डॉ बी एस पाटील,जिल्हा कार्य अध्यक्ष शालिग्राम मालकर, तालुका अध्यक्ष सचिन पाटील,शहर अध्यक्ष श्याम पाटील,जेष्ठ नेत्या तिलोत्तमा पाटील, योजना पाटील,गणेश नकवाल, जाकीर शेख,प्रशांत निकम आदी कार्यकर्ते उपस्थित होते.