मंत्री अनिल पाटील यांच्या प्रयत्नाने अनेक वर्षांच्या मागणीला आले मूर्त स्वरूप
अमळनेर :येथील बस स्थानका शेजारील टॅक्सी स्टँडवर प्रवासी बांधवाचे ऊन व पावसापासून संरक्षण व्हावे अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून असताना मंत्री अनिल भाईदास पाटील यांच्या प्रयत्नाने स्थानिक आमदार निधीतुन भव्य पिकअप शेड उभारले गेल्याने या कामाचे थाटात लोकार्पण मंत्री पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
लोकार्पण सोहळ्यानिमित्त उत्तर महाराष्ट्र टॅक्सी महासंघ मेळाव्याचे आयोजन देखील अमळनेरात करण्यात आले होते,उदघाटनानंतर मनोगत व्यक्त करताना मंत्री पाटील म्हणाले की या पीकअप शेडसाठी अनेकांनी फक्त आश्वासन दिले,प्रत्यक्षात हे काम सोपे नव्हतेच,तांत्रिक अडचणी असल्याने मलाही यासाठी प्रशासनाशी चार वर्षे भांडावे लागले त्यामुळेच हे काम मी मार्गी लावू शकलो,प्रत्यक्षात मी देखील शालेय व युवा जीवनात टॅक्सी ने नियमित प्रवास केला असून गेल्या अनेक वर्षांपासून टॅक्सी चालक प्रामाणिक सेवा देताय,एक भूमीपुत्र म्हणून मला त्यांची समस्या माहीत असल्याने त्याच तळमळीने हे शेड मी निर्माण केले असून यामुळे ऊन व पावसापासून संरक्षण तर होईलच पण शिस्तीने व रांगेने गाड्या लागल्याने वाहतुक विस्कळीत होण्याची समस्याही सुटेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
माजी नगराध्यक्ष सुभाष चौधरी यांनी टॅक्सी स्टँड ही मोठी भेट मंत्री पाटील यांनी दिली असून या तालुक्यातील प्रत्येक घटकासाठी व विशेष करून पाडळसरे धरणासाठी ते खूप काही करीत असल्याने येणाऱ्या निवडणुकीत सर्वानी त्यांनाच साथ द्या असे आवाहन त्यांनी केले.यावेळी जळगाव युनियन चे अध्यक्ष रजाक गनी खान,देविदास देसले यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी मंत्री पाटील यांचा युनियन तर्फे विशेष सत्कार करण्यात आला.यावेळी अमळनेर युनियन चे अध्यक्ष बंडू केळकर,धुळे युनियन अध्यक्ष शिवाजी शेंडे,शहादा युनियन चे अरुण चौधरी,पारोळा युनियन चे आबा चौधरी,चोपडा युनियन चे राजू पाटील तसेच अमळनेर युनियन चे राजेंद्र परदेशी,ईश्वर पाटील,ईश्वर देशमुख,सुनिलदत्त रणधीर,मेहमूद खा पठाण,गणेश महाजन,प्रकाश पवार,विठ्ठल शिंदे,कैलास पाटील,नितीन पाटील,यासह सर्व चालक व मालक सदस्य, प्रवासी बांधव आणि पत्रकार बांधव उपस्थित होते.सूत्रसंचालन विनोद कदम यांनी केले.