पुणे: ( राजश्री बडगुजर ) रविवार दि. 18 ऑगस्ट 2024 रोजी स्थळ: मनोहर सभागृह , सिंधूनगर प्राधिकरण येथे बडगुजर बहुउद्देशीय संस्था, वार्षिक स्नेह समाज मेळावा 2024 पुणे होत असून आपणा सर्व समाज बांधवांना आमंत्रित करत आहे.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून सुरेश शिवराम शेठ महाले, मोहन हिरालाल शेठ बडगुजर गोपाल भाईदास शेठ बडगुजर भगवान लक्ष्मण शेठ बडगुजर हे उपस्थित राहणार असून कार्यक्रम सकाळी दहा वाजेपासून तर दुपारी दीड वाजेपर्यंत चालणार असून यावेळी कार्यक्रमाची रूपरेषा पुढील प्रमाणे असणार आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षांची निवड, मान्यवरांचे व्यासपीठावर सन्मानपूर्वक स्वागत, श्री गणेश आणि चामुंडा मातेचे पूजन व दीप प्रज्वलन, कार्यक्रमाची प्रस्तावना, बडगुजर समाचार अंकाचे प्रकाशन, त्रिराज्यस्तरीय वधु वर मेळावा चे जमा खर्च अहवाल वाचन, तसेच लहान मुलांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धा, तसेच
त्रीराज्यस्तरीय वधू वर पालक मिळाल्यास जमलेले पालकांचे स्वागत सत्कार मंडळातर्फे आयोजित करण्यात आलेला आहे . तसेच दहावी व बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी सत्कार व बक्षीस समारंभ, प्रमुख पाहुण्यांचे सत्कार व अध्यक्ष हे भाषण आभार प्रदर्शन, संगीतमय जुन्या व नव्या गाण्यांच्या कार्यक्रम व त्यानंतर स्नेह भोजनाची व्यवस्था केलेली असून सर्व समाज बांधवांनी उपस्थित राहण्याचे आवाहन मंडळाचे सचिव अध्यक्ष कार्याध्यक्ष उपाध्यक्ष सदस्य व सल्लागार मंडळ यांच्याकडून करण्यात आले आहे.
कृपया आपणांस मिळालेली ही निमंत्रण पत्रिका पुणे , पिंपरी चिंचवड परिसरातील बडगुजर समाज बांधवांपर्यंत पोहचवण्यासाठी मदत करावी व मोठ्या संख्येने उपस्थित राहावे