रोटरी पदग्रहण समारोहसाठी 41 मुलांची स्पेशल माता येणार अमळनेरात ….
अमळनेर: सालाबादप्रमाणे रोटरी क्लब अमळनेर नविन वर्षाची सुरुवात म्हणून एक नवीन चेहरा अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली जाते व त्याचप्रमाणे वर्षभर कार्य करणारा अध्यक्ष हा माजी म्हणून आपले कार्यभार नवीन अध्यक्ष यांना सोपवतो यावर्षी येणाऱ्या 4 ऑगस्ट 2024 रोजी ह्या पदग्रहण समारंभाचे आयोजन केले आहे सदर कार्यक्रम अंतर्गत वक्ता म्हणून डॉ प्राजकता कोलपकर पुणे येथून येणाऱ असुन सदर स्पेशल 41 मुलांची स्पेशल आई म्हणुन यांची ओळख आहे .यांची उपस्थिती या कार्यक्रमात लाभणार आहे.
कार्यक्रमाचे अध्यक्ष हे जळगाव येथील सुप्रसिद्ध बालरोग तज्ञ व येणाऱ्या काळातील रोटरी डिस्टिक मधील भावी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रो.डॉ.राजेश पाटील त्याचबरोबर असिस्टंट गव्हर्नर रो.डॉ.संदीप देशमुख तसेच असिस्टंट गव्हर्नर रो.अभिजित भांडारकर यांची उपस्थिती राहणार आहे. या वेळी माजी अध्यक्ष रो. प्रतीक जैन अध्यक्ष पद नुतन अध्यक्ष रो. ताहा बुकवाला यांना सोपविणार आहे तर रो. देवेंद्र कोठारी सचिव पद नुतन सचिव रो. विशाल शर्मा यांना सोपविणार आहे. अशी माहिती रोटरी चे पी.आर.ओ रो.अभिजीत भंडारकर व रो. रौनक संकलेचा यानी दिल्ली.