अमळनेर: व्ही .झेड. पाटील हायस्कूल शिरूड येथे दिनांक 1/8/2024रोजी लोकमान्य टिळक पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती साजरा करण्यात आली.*
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान शाळेचे मुख्याध्यापक अनिल पाटील सर यांनी स्वीकारले तसेच प्रमुख पाहुणे म्हणून श्री.आर.बी पाटील सर यांना आमंत्रित करण्यात आले होते. त्यांनी थोर पुरुषबद्दल विविध मुद्दे विद्यार्थ्यांना सांगण्यात आले. त्यानंतर वकृत्व स्पर्धेला सुरुवात करण्यात आली त्यात इयत्ता पाचवी ते दहावीतील विद्यार्थ्यांनी लोकमान्य टिळक व लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या जीवनाबद्दल व त्यांच्या कार्यक्षेत्राबद्दल भाषणे दिली. इयत्ता पाचवी ते सातवी लहान गट व इयत्ता आठवी ते दहावी मोठा गट असे दोन गट करण्यात आले होते लहान गटा तून तीन विद्यार्थी व मोठ्या गटातून तीन विद्यार्थी निवडण्यात आले..पर्यवेक्षक म्हणून श्रीमती. राधिका अहिरे मॅडम, श्रीमती. वैशाली भोई मॅडम यांनी काम पहिले.
त्यानंतर अध्यक्ष भाषण होऊन समारोप करण्यात आला.त्या कार्यक्रमात शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
सूत्रसंचालन :-श्री. पी. जे. निकम,सर
आभार :-श्री. व्ही. डी. सूर्यवंशी, सर