
अमळनेर: दिनांक.01ऑगस्ट 2024 ग्राम विकास मंडळ नवलनगर संचलित कै. सु आ पाटील माध्यमिक विद्यालय पिंपळे बु!! येथे भारतीय असंतोषाचे जनक लोकमान्य टिळक पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक आदरणीय बापूसो.श्री एस एच भोसले सर यांनी लोकमान्य टिळक यांचा जीवनपट विद्यार्थ्यांसमोर मांडला. प्रमुख वक्ते श्री.एम पी निकम सर,यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे संघर्षमय जीवन आणि त्यांचे प्रेरणादायी विचार मांडले. विद्यालयातील शिक्षिका श्रीमती. शिरसाठ मॅडम यांनी लोकमान्य टिळक यांच्या विषयी विचार मांडले आणि आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता दहावीच्या विद्यार्थिनींनी केले. प्रसंगी ज्येष्ठ शिक्षक ,श्री.डी बी पाटील सर श्री. सी एन पाटील सर व सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी वृंद उपस्थित होते.