अमळनेर – विधानसभा मतदार संधाच्या विकासासाठी अपक्षच उमेदवारी म.आ.श्री. शिरीषदादा चौधरी
मतदार संघाच्या खुटलेला विकास व मागील साडेचार वर्षापासुन मतदार जनता जनार्दन शेतकरी
शेतमजुर्, कष्करी, यांची होणारी अवेहलना पाहता माझी उमेदवारी अपक्ष राहणार जनता जनार्दन हाच माझा
पक्ष असून विरोधकाकडून होणारा अपप्रचार याला उत्तर देण्यासाठी अपक्षच उमेदारी करणार असल्यांचे माजी
आमदार शिरीषदादा चौधरी यांनी सांगितले,
काही दिवसापासून सर्वाना माहित आहे कि आपल्या मतदार संघाचे आमदार महाराष्ट्र राज्याचे मंत्री
जनतेला कशी वागणूक देत आहे. तसेच मतदार संघाकड़े दुर्लक्ष करीत आहे. हे सर्वाना ज्ञात आहे . मतदार
संघाचा विकास खुंटलेला आहे. रंग बदलणारा सरडा सारखा रंग बदलत आहे. हे सर्व मतदारांनी बधितले कधी
भाजपा, पवार साहेब तर अजित दादा यांच्या खडतर प्रवास सर्वाना माहित आहे. आगामी होणाच्या विधानसभा
डोळ्यासमोर ठेऊन रामकृष्ण हरी वाजवा तुतारी म्हणणारे कृषाणाईत बैठक करत असल्याचे समजले कोणती
निष्ठा कोणते किवा कोणते राजकारण हे समजत नाही. जनता एवढ़ी खुड़ी नाही मतदारांचा कोणताच विचार हे
राजकारणी लोक करत नाही. जनतेचा मतांचा विचार यांच्या डोक्यात नाही . तरी यांना मनी सांगू इच्छोतो कि
जनतेला आपण काय समजतात त्यांच्या भावनाशी खेळू नका जनता ह्या नेत्यांना आपली जागा
दाखविल्याशिवाय रहाणार नाही. आपल्या पक्ष्याच्या पदाध्िकारी यांचा कार्यकत्याच्या भावनानाच्या विचार
देखील हे करत नाही, मतदार जसे हे सांगतील तसे वागतील असे वाटत असेल तर विधानसभा मतदार संघातील सुज्ञ नागरिक मागील वेळेस झालेली चुक या वेळेस करणार नाहीत, हा ठाम विश्वास मला आहे.
मागील विधानसभा निवडणूकीचत खोटा मुद्दा जनतेसमोर आणला व जातीपातीचे राजकारण करून तेढ
निर्माण केले , आपली पोळी भाजून घेतली जनता आता स्वार्थी लबाडाना थारा देणार नाही . तालुक्याची दुरावस्था
आपल्यासमोर आहे तरी मतदार राजा योग्य वेळेस जागा दाखविल्याशिवाय राहणार नाही ,
काही राजकारणी माझ्या विषयी बोलत आहे . मी महायुतीच्या नेत्यांसोबत आहे मला सांगावे असे
वाटते कि विधानसभा मतदार संघाच्या विकासासाठी मी महायुतीच्या नेत्यांसोबत आहे . परंतु त्याचा अर्थ असा
नाही मला स्थानिक स्वराज्य संस्था किवा राज्यपाल नियुत्त सदस्य करतील व मी थांबुन जाईल असे
कदापि होणार नाही विधानसभा मतदार संघाच्या विकासासाठी शेतकरी शेतमजूर कष्टकरी व नवतरुणाई यांच्या साठी जनता माझी उमेदवारी जनता जनार्दनाच्या भरोशावर अपक्षच आहे व ती मी करणारच कोणी काही वावड्या उठ्वू नये वेळ आल्यावर सर्व प्रश्नाची उत्तरे दिली जातीली.यात तीळमात्र शंका नाही. माझी उमेदवारी जनतेसाठीच आहे. जनता जनार्दन हाच पक्ष म्हणून उमेदवारी अपक्ष ,