अमळनेर( प्रतिनिधी ): सन 2024 मध्ये झालेल्या NMMS परीक्षेत शाळेतून निशा किरण पाटील ही विद्यार्थिनी उत्तीर्ण झाली असून तिला सारथी स्कॉलरशिप मिळणार आहे. त्याबद्दल सर्व स्तरातून तिचे कौतुक करण्यात येत आहे.
सकल मराठा समाजाकडून SSC परीक्षेत प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यास पारितोषिक दिले जाते .त्या पारितोषिकसाठी शाळेतून 92 टक्के मिळून प्रथम येणारा विद्यार्थी ऋषीराज दगडू पाटील याची निवड करण्यात आली आहे. वरणेश्वर महादेव ट्रस्ट यांकडून 90% पेक्षा अधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी देण्यात येणाऱ्या पारितोषिकहेतू शाळेतून ऋषीराज पाटील व प्रशांत पवार या दोन विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे.
शैक्षणिक वर्ष 2024/ 25 च्या प्रथम सत्रात 13 जुलै 2024 रोजी स्कूल कमिटीचे चेअरमन बाबासो! श्री. सुनील राजधर पाटील यांच्या अध्यक्षतेखाली शालेय समितीची सभा संपन्न झाली. त्यात शाळेच्या प्रगतीसाठी विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. सभेच्या समारोप वृक्षलागवड करून झाला.
शासनाच्या उपक्रम शैक्षणिक सप्ताह शाळेत उत्साहाने साजरा करण्यात आला. विविध पारंपारिक खेळ, गणिती उपकरणांचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजवणे, कथाकथन स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम शालेय स्तरावर घेण्यात आले. सप्ताहाच्या शेवटच्या दिवशी विद्यार्थ्यांना मिष्ठान्न भोजन म्हणून शिरा देण्यात आला.
शाळेच्या प्रगतीसाठी, शाळेचे मुख्याध्यापक श्री. जे.व्ही. बागल तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे शालेय स्कूल कमिटी चेअरमन बाबासो! सुनील राजधर पाटील, संस्थेचे अध्यक्ष बापूसो! श्री उदय नारायण पाटील, संस्थेचे ऑ. सेक्रेटरी श्री. भरत जीवन पाटील या सन्माननीय पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्यात