पोलिस भरतीत मयत अक्षयच्या कुटुंबियांना मंत्री अनिल पाटलांकडून मदतीचा हात

एक लाखांची मदत देऊन दिला आधार

अमळनेर: येथील प्रबुद्ध कॉलनीतील रहिवासी असलेला आणि मुंबईत पोलीस भरती दरम्यान मयत झालेल्या अक्षय बिऱ्हाडेच्या कुटुंबियांना मदत व पुनर्वसन मंत्री अनिल भाईदास पाटील यांनी वैयक्तिक 1 लाखांची मदत देऊन आधार देण्याचा प्रयत्न केला आहे.
अक्षय च्या परिवाराची मंत्री ना.अनिल पाटील यांनी त्याच्या राहत्या घरी सांत्वनपर भेट दिली असता सर्व परिस्थिती ची माहिती घेऊन झालेला प्रकार अतिशय दुःखद असल्याचे सांगून मुख्यमंत्री सहायता निधीतून मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले आहे.याबाबत तहसीलदारांना सूचनाही केल्या असून प्रस्ताव शासन दरबारी पोहोचल्यावर लवकरात लवकर योग्य ती आर्थिक मदत मिळवून देण्याचे त्यांचे प्रयत्न आहेत.तसेच उपचारात हलगर्जीपणाची तक्रार असल्याने कळवा येथील हॉस्पिटल ची चौकशीही होणार असल्याचेही मंत्र्यांनी सांगितले आहे.दरम्यान बिऱ्हाडे कुटुंबातील एकुलता एक मुलगा गेल्याने कुटुंबियांची आर्थिक परिस्थिती पाहता शासनाची मदत पुढे मिळेलच मात्र आता स्वतः त्यांच्याकडून मयताच्या परिवारास १०००००/-(एक लाख रुपये) आर्थिक मदत देण्याचे त्यांनी जाहीर केले होते.त्यानुसार समाज बांधवांच्या उपस्थितीत 1 लाख मदतीची रक्कम मयत अक्षय च्या वडिलांकडे सुपूर्द करण्यात आली.यावेळी ऍड.एस.एस. ब्रम्हे,सोमचंद संदानशिव,भानुदास कांबळे, दत्ता संदानशिव,दिनेश बिऱ्हाडे,सिद्धार्थ सोनवणे,गोकुळ बिऱ्हाडे,हृदयनाथ मोरे,तुषार संदानशिव,समाधान मैराळे,जितेंद्र हगवणे,विक्की पानसे तसेच प्रबुद्ध कॉलनीतील रहिवाशी समाजबांधव आणि पोलीस भरतीतील मित्र परिवार उपस्थित होता.सदर योगदानाबद्दल समाजबांधवांनी मंत्री पाटील यांचे आभार व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

[democracy id="1"]