प्रकाशभाई पाटील युवा मंच अमळनेर तर्फे कृषी मंत्री धनजय मुंडे साहेबांना 31ऑगस्ट पर्यंत पिक विमा मुदत वाढीचे साकळे

अमळनेर: केंद्रीय कल्याणकारी योजनेअंतर्गत प्रधानमंत्री पिक विमा योजना सन 2024 विमा काढण्याची मुदत 15 जुलै 2024 पर्यंत होती परंतु शासनाचे विविध योजनांचे ह्या ऑनलाईन असल्याने गेल्या आठ दिवसापासून सर्व सर्व्हर डाऊन असल्याकारणाने अनेक अशा शेतकऱ्यांचे पिक विमा काढण्याचे राहून गेले आहे त्या अनुषंगाने अंमळनेर येथील प्रकाशभाई पाटील युवा विकास मंचच्या वतीने मा.ना श्री.धंनजय मुंडे साहेब कृषी मंत्री,महाराष्ट्र राज्य यांना 13जुलै 2024 रोजी ईमेलद्वारे 31 ऑगस्ट पर्यंत मुदत वाढविण्यात यावी असे निवेदन पाठवण्यात आले आहे.
तरी आज रोजी जळगाव येथील निवासी उपजिल्हाधिकारी आदरणीय कासार साहेब यांना प्रधानमंत्री पीक विमा भरण्याची मुदत 31 ऑगस्ट 2024पर्यंत वाढून मिळावी यासाठी आज रोजी जळगाव येथे जाऊन प्रकाशभाई युवा विकास मंचाचे अध्यक्ष सुरेश अर्जुन पाटील तसेच प्रसिद्धी प्रमुख शामकांत पाटील व प्रकाशभाई पटेल यांचे स्विय सहाय्यक गुलाब आगळे यांनी जळगाव येथे शेतकऱ्यांच्या मागणीनुसार निवेदन दिले तरी शासनाने याची दखल घ्यावी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

[democracy id="1"]